Home Social पारशिवनी येथे सणोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता पारशिवणी पोलीसांनी काढला रूट...

पारशिवनी येथे सणोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता पारशिवणी पोलीसांनी काढला रूट मार्च…  — रूट मार्च दरम्यान गांधी चौक येथे दंगा काबू योजने बाबत घेण्यात आला सराव.

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- पारशिवनी पोलिस स्टेशनच्या हदितील महालक्ष्मी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणोत्सवचा बंदोबस्त असल्याने सणोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता श्री.रमेश बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक उपविभाग,पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात,प्रभारी अधिकारी,पोलीस स्टेशन पारशिवणी यांचे उपस्थितीत पारशिवणी पोलीसांनी रूट मार्च काढला.

        सदर रूट मार्च पोलीस स्टेशन,बॅक ऑफ इंडीया चौक,शिवाजी चौक,गांधी चौक,बाजार चौक ते परत पोलीस स्टेशन या मार्गाने घेण्यात आला. 

       रूट मार्च दरम्यान गांधी चौक येथे दंगा काबू योजने बाबत सराव घेण्यात आला.सदर रूट मार्च व दंगा काबू योजनेत पोलीस स्टेशन पारशिवणी तसेच रामटेक उपविभागातील पोलीस स्टेशन रामटेक,अरोली,देवलापार येथील अधिकारी आणि अंमलदारांसह दंगा नियत्रंण पथक आणि गृहरक्षक उपस्थित होते.

       रूट मार्च आणि दंगा काबु योजना राबवुन नागपुर ग्रामीण पोलीस दलातर्फे जनतेने सणोउत्सव आनंदाने,निर्भयतेने तसेच शांततेत साजरा करण्याबाबत आव्हान करण्यात आले.