ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) जमनापूर/साकोली येथे गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर विघ्नहर्ता नवजीवनचा राजा ची स्थापना करण्यात आली.

‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’ या जयजयकारांनी, ढोल, ताशा आणि लेझीमच्या मनोहर मेळाव्यातून नवजीवनचा राजाची मूर्ती विद्यालयात आणण्यात आली. पांडुरंग रुपी गणेशा साठी शिक्षक आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मनोभावे अप्रतिम पंढरपुरी देखावा सजावटीतून साकार केला. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अपार उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या विशेष कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि शालेय वातावरण आनंद आणि उत्साहाने भरून गेले होते.



