शुभम गजभिये
तालुका प्रतिनिधी..
चिमूर तालूक्यात गौण खनिजचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.मौजा पुयारदड येथे मुरमाचे उत्खनन सुरू आहे.
काही दिवसांपासुन अवैध रेती उत्खनन करणाऱ्यावर कार्यवाही होत आहे.त्यामुळे रेती तस्कर थोडे शांत बसले आहेत.
आता तर मुरूम उत्खनन करणाऱ्यांनी डोके वर काढले असून मुरुम उत्खनन सर्रास सुरू आहे.आता पर्यंत अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यां चोरांवर तालूक्यात कोणतीही मोठी कार्यवाही महसुल विभागा कडून करण्यात आली नसल्याने या अवैध्य रेती तस्करांचे लक्ष अवैधरीत्या मुरूम उत्खनन करण्याकडे लागले आहे.
तालूक्यात ६० टक्के मुरमाचे उत्खनन अवैध होत आहे.१०० ब्रासची परवानगी असताना ५०० ब्रास मुरमाचे उत्खनन केले आहे.संबंधित ठेकेदाराला ३ ते ४ दिवसाची परवानगी दिली जाते.पण ती परवानगी पंधरा ते विस दिवस मुरूम उत्खनन करणारा लिजधारक चालवित असतो.
ठेकेदार हे महसूल विभागाच्या हातात तुरी देऊन नियम बाह्य मुरमाचे उत्खनन करित आहेत.जेव्हा मुरमाचे गाड्या भरून निगत असतात तेव्हा प्रत्येक गाडीला रॉयल्टी देणे आवश्यक असते.
पण महसूल विभागाकडून रायल्टी बुक दिली जात नाही का?.रॉयल्टी बुक दाखवण्या साठी ठेकेदार जवळ ठेवीत असतात.तोच रॉयल्टी बुक मुरूम उत्खनन करणारा ठेकेदार पंदरा ते विस दिवस चालवतात.
पुन्हा तहसील मध्ये जाऊन उत्खननाची तारीक वाढवून ठेकेदार त्याच बुकाचा वापर करीत असतात.जेव्हा परत ठेकेदारा कडून उत्खनन केले जातात.
नंतर त्या उत्खननाची महसुल विभागा कडून मोजनी करणे आवश्यक असते.पण महसुल विभागा कडून केली जात नाही.म्हणूनच ठेकेदार हे पाच ते दहा पट मुरूमा चे उत्खनन करीत आहेत.
यामुळे वरिष्ठाकडून या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिमूर तालुक्यातील नागरिक करीत आहेत.



