Home सांस्कृतिक निसर्ग राजाची अशीच साथ राहू दे,माझ्या शेतकरी राजाच्या कष्टाचे फळ मिळुन जीवन...

निसर्ग राजाची अशीच साथ राहू दे,माझ्या शेतकरी राजाच्या कष्टाचे फळ मिळुन जीवन सुखी राहू दे :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे… — कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानी फळा,फुलांची सजावट करून गणरायाची स्थापना…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

      कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भरणे परिवाराच्या वतीने गणरायाची स्थापना करण्यात आली.गणरायाचे आगमन म्हणजे प्रत्येक घरात सुख, शांती आणि आनंदाचा क्षण असतो.भरणे परिवाराने नेहमीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला आहे.

          या निमित्ताने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की माझी गणरायाकडे प्रार्थना आहे की, राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक यावे, शेतकऱ्यांच्या चेहर्यावर आनंद नांदो आणि त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळो,असे साकडे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गणारायाला घातले.

        भरणे कुटुंबीयांनी शेतातील, फळे, फुले व नैसर्गिक उत्पादने वापरून देखणी आरास सजवली. या मंगल प्रसंगी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व त्यांच्या सुविद्य पत्नी सारिका भरणे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली.

          गणेश स्थापनेनंतर उपस्थितांना संबोधित करताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, की शेतकरी हा समाजाचा पोशिंदा आहे. त्याचे भले झाल्यास समाजातील प्रत्येक घटक सुखी राहतो. शेतातील पिके, फळे आणि फुले ही केवळ शेतकऱ्याच्य उदरनिर्वाहासाठी नाहीत, तर मानवी जीवनाच्या पोषणासाठी अत्यंत आवश्यक आहेत. याच ऋणातून भरणे कुटुंबाने गणरायाची सजावट शेतातील पिक, फळे व फुलांनी केली आहे. 

     गणरायाच्या स्वागतासाठी भरणे कुटुंबा सोबत मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.