Home Maharashtra कुरखेडा तालुक्यात सती नदी पुलाचे व रस्त्याच्या कामांची पाहणी… – आमदार...

कुरखेडा तालुक्यात सती नदी पुलाचे व रस्त्याच्या कामांची पाहणी… – आमदार रामदास मसराम यांनी दिले काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

कुरखेडा :- आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाच्या विकासकामांची गती वाढविण्यासाठी आमदार रामदास मसराम यांनी कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पुलाचे प्रत्यक्ष पाहणी केली. पुलाचे काम सुरु असताना आमदारांनी ठिकाणी भेट देऊन कामाच्या गुणवत्तेची व प्रगतीची सविस्तर माहिती घेतली.

          यावेळी आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करताना स्पष्ट निर्देश दिले की, हे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे आणि नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने वापरात आणले जावे. पुलाचे काम वेळेत न झाल्यास वाहतुकीस अडचणी निर्माण होतात व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो, याची नोंद घेत त्यांनी ठेकेदार व अभियंत्यांना जबाबदारीने काम करण्याचे आदेश दिले.

            पुलाची पाहणी केल्यानंतर आमदार मसराम यांनी गोथणगाव – कोरची टी पॉईंट रस्त्याच्या कामाचीही तपासणी केली. या रस्त्यावरील काही भागांत काम विलंबाने होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आमदार रामदास मसराम यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीने कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले.

          तसेच उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि जिल्हाधिकारी यांच्याशी थेट फोनद्वारे संवाद साधून रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वय साधण्याचे आदेश दिले.

          त्या वेळी सोबत , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, जयंतजी हरडे, माजी सभापती कुरखेडा गिरीधर तीतराम, सागर वाढई, कमलेश बारस्कर उपस्थित होते.