Home Maharashtra शेतीच्या वादातून पारशिवनीत खुनी संघर्ष… — गंभीर जखमीला नागपूर येथील खाजगी...

शेतीच्या वादातून पारशिवनीत खुनी संघर्ष… — गंभीर जखमीला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवले…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हद्दी अंतर्गत शेतातील वादावरून कार चालकाने दुचाकीस धडक दिली.यात दुचकीचालक जखमी झाला.ही घटना पारशीवनी येथील ग्रामीण रुग्णालय जवळ मंगळवरी दुपारी ४.३० ला घडली.

      गंभिर जख्मी लालू आसाराम एकनाथ (४६,राहणार सरोदी टोली, पारशिवनी) असे जखमीचे नाव आहे,तर आरोपी वाल्या राणु भोयर (३५, सरोदी टोली,पालोरा,तालुका पारशिवणी) असे आरोपीचे नाव आहे. 

        लालू एकनाथ व वाल्या भोयर यांचे शेतातील पाणी अडवण्यावरून एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते.मंगळवारी दुपारी ४.३० वाजता लालू एकनाथ हा आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.४०,सी.यु. ६५८९ ने पारशिवनी ते सावनेर मार्गाने आपल्या घरी जात होता.

       अशातच वाल्या भोयर याने आपली कार क्रमांक एम.एच.३१,सी.पी. ७४६९ ने मागून दुचाकीस जोरात धडक दिली.यात दुचाकीस्वार लालू एकनाथ खाली पडला.

        यानंतर वाल्याने आपल्या जवळील तलवारीने लालुवर सपासप वार केले.यात लालू एकनाथ गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती कळताच पारशिवणी पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.

       घटना स्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट दिली व सख्त चौकशी करण्याचे आदेश दिले.पारशिवनी पोलिसानी गंभिर जखमीस नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविले.

       आरोपीस अटक करण्यात आली.पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहे.