शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुक्यातील भीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोहारा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमास भीसी पोलीसांनी अटक करून कार्यवाही करण्यात यश मिळवले आहे.
पोलिस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार भीसी परिसरातील लोहारा या गावात अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याची माहिती वरुन या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरता भीसी पोलिस पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की आरोपी नामे प्रज्वल धारणे रा. लोहारा हा अवैध रित्या दारू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन बोडदा नदीवर पो स्टेशन कर्मचारी दबा धरून बसले असता सदर आरोपी हा दिसताच त्याला थांबवून त्याच्या ताब्यातून 180 ml ची 192 कोकण कंपनीच्या देशी दारूच्या निपा प्रत्येकी किंमत शंभर रुपये प्रमाणे एकूण 19 हजार दोनशे रुपयांचा दारूचा मुद्देमाल अवैध वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपींकडून जागीच जप्त करण्यात यश मिळवले.
तसेच एक मोटारसायकल किंमत 70 हजार रुपये अशी एकूण 89200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन भीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकेडे उपयोगी पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनामध्ये प्रभारी पोस्टे ठाणेदार भिसी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगडे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वाघ, पोलिस उपनिरीक्षक भारत थिटे, पोलीस हवालदार अजय बगडे, बाळकृष्ण जिबकाटे , पोलीस अमलदार श्रीकांत वाढवी यांनी पार पाडलेली आहे.
या कार्यवाही मुळे लोहारा गावातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून गावातील अवैध दारू चे अड्डे उद्धस्त करण्यासाठी पोलिस विभाग अलर्ट असल्याचे पोलिस विभागाकडून सांगितले आहे.



