कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशीवनी :- तालुका महसुल विभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पथका व पारशिवनी पोलीसानी पालोरा शिवारातील पेंच नदीपात्रात अवैध वाळू उत्खनना प्रकरणी कारवाई करून एक पोकलँड ५० लाख,एक जेसीबी २५ लाख व दोन ट्रक ६० लाख,४ मोबाईल ४० हजार,असा मुद्देमाल जप्त केलाय.
यात जवळपास १४० ब्रास रेतीसाठा आढळून आला.या वाळू साठ्याची किंमत ७ लाख रुपये आहे.हा वाळू साठा सुध्दा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई रविवारी रात्री ७ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
पारशीवनी पासून पुर्व दिशेला अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळू घाटावर तहसिलदार सुरेश वाघचौरे,खनिकर्म विभागाचे योगेश बर्वे,तलाठी गणेश चव्हाण,तलाठी विश्वजीत पुरमकर,स्थानिक पोलीस निरिक्षक राजेशकुमार थोरात,पो.उप निरिक्षक शिवाजी भताने,गोपनिय विभागाचे पृथ्वीराज चौहान व गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज गदादे,सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेरकी,उमेश फुलवेल,वीरेंद्र नरड,विपीन गायधने,अमित मेहरे यांचा समावेश असलेल्या पथकाने वाळू चोरी करणाऱ्यांवर यशस्वी कार्यवाही केली.
घटनास्थळावर १) पोकलँड चालक निकेश रामती नारायणसिंग वय ३३ वर्ष,वार्ड नं. 3 दहेगाव रंगारी, २) जेसिबी चालक अमित विष्णु देशमुख ३० वर्ष रा.वार्ड नं.१ जयभोले नगर चनकापुर,३) टिप्पर चालक मोहम्मद कमर ताजुद्दीन खान वय ३२ वर्ष राहणार वार्ड क्रमांक ४ वलनी, ४) टिप्पर चालक राजेन्द्र श्रावण शेडे वय ४० वर्ष रा.पारडी पारशिवनी आणि ५) सुजाद अहमद सिद्दीकी वय ५६ वर्ष रा.अनंत नगर नागपुर,हे मिळून आले.

यांना पोलिसांनी विचारले असता त्यानी सांगितले की आम्ही कमर अहमद सिद्दीकी व तरबेज अहमद सिद्दीकी यांचे सांगण्यावरून वाहन नदीत आणुन मशिनच्या सहायान रेती चोरी करून १४० ब्रास रेती जमा केली.
यावरून स्थानिय पोलिस विभाग,महशुल विभागावर परिसरातील नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती प्राप्त झाली.त्या माहितीच्या आधारे त्यांनी पेंच नदीच्या पात्रातील पालोरा शिवारात स्थानिय पोलिस महशुल विभागाचे सहाय्याने स्थानिय गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली.
यावेळी त्यांना एक पोकलॅन्ड मशीन,एक जेसीबी मशीन व दोन ट्रक द्वारे रेती उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले.लागलीच त्यांनी घटनेची माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना,पारशिवणी पोलिस व महसूल अधिकाऱ्यांना दिली.
या ठिकाणी जवळपास १४० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला.पोकलॅन्ड,जेसीबी व ट्रक क्रमांक एम.एच.४०,ए.सी. ५१२८,ट्रक क्रमांक एम.एच.४०, ए.के.५५४५ जप्त करण्यात आले.
कमर अहमद सिद्दीकी,तरबेज अहमद सिद्दीकी,सुजाद अहमद सिद्दीकी हे मोठे रेती तस्कर असल्याचे सांगितले जाते .



