कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी :- पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एकुण ९ ठिकाणी धाड़ी टाकून १० आरोपींवर पोलिसांद्वारे कार्यवाही करणयात आली.
पारशिवनी व कन्हान पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी अनेक ठिकाणी अवैध दारू बाळगुन विक्री आणि सेवन करणाऱ्या स्थळावर धाडी टाकून मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्यावर कारवाई केली.
आरोपी मध्ये १) खेमचंद भोजराज निबोंने वार्ड नं.२ नया कुंड २) दिलिप आनंदराव ढोंगें वय ४५ वर्ष सुवरधरा ,३) व्यंकटेश माणिक चौधरी वय ४२ वर्ष रा.माहुली,४) गोपाल बाबुराव नरांजे ४६ वर्ष रा.करंभाड,५) तुलसीराम प्रल्हाद शिंदे ५४ वर्ष रा.डोरली,६) राजकुमार सावजी महेलवंशी ४२ वर्ष रा.हेटीटोला,७) रवि श्रीराम सिरसाम ३४ रा.बनेरा, ८) एक महिला ,९) सुखदेव रमेश साहानी रा.कोळशा खदान नं सहा,१०) प्रविण चन्दभान शेलारे रा केरडी,ह.मु.कन्हान यांचा समावेश आहे.
मादक द्रव्य पदार्थ अधिनियम कलम ३२ अन्वये गुन्हा नोंद करून मुद्देमाल जप्त केला व पुढील तपास स्थानिय पोलिस करित आहे.



