Home Social नेरी येथे बैल पोळा व तान्हा पोळा उत्साहात साजरा…

नेरी येथे बैल पोळा व तान्हा पोळा उत्साहात साजरा…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

    चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथे बैल पोळा व बालगोपालांचा तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बाजार चौकातील राजीव गांधी विचारपिठा समोर बैल पोळा व तान्हा पोळा भरविण्यात आला होता.

      स्थानिक प्रतिनिधी द्वारे या ठिकाणी नवीन उपक्रम आयोजित करण्यात आले होते.या उपक्रमांमध्ये लोकांनी सहभाग घेतला होता.

          याचबरोबर आ.किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडीया मीत्र परिवाराच्या वतीने नंदी बैल पोळ्यात लक्की ड्रा च्या पध्दतीने सायकल बक्षीस देण्यात आले.तसेच प्रोत्साहन बक्षिसामध्ये स्कुल बॅग,पाण्याची कॅन,दिवाली घड्याळ सुद्धा देण्यात आली.

       ग्रामपंचायत च्या वतीने बैल पोळ्यात बैल जोडी ची व तान्हा पोळ्यात नंदी बैलांची आरती ओवाळून पुजा करण्यात आली आणि बक्षिसे देण्यात आले.

      याप्रसंगी विचारपीठावर सरपंच रेखा पिसे,उपसरपंच चंद्रभान कामडी,संजय डोंगरे,कमलाकर लोनकर,दत्तु पिसे,सतिश आष्टनकर,मंगेश चांदेकर,सुरेश कामडी,संदीप पिसे,पिंटु खाटीक,ग्रामपंचायत सदस्य वसंता कामडी,ग्रामपंचायत सदस्या पद्मश्री नागदेवते,सरिता जनबंधु,संगीता वैरागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

        या तान्हा पोळ्यामध्ये गावकरी महीला,पुरुष,मुले,मुली, यांच्यात प्रामुख्याने उत्साह होता.पण,तान्हा पोळा प्रसंगी बालगोपालांना खुप आनंद घेता आला.