पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी देसाईगंज/वडसा
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ. रामदास मसराम यांचा दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी रक्तदान शिबीर, वृक्षारोपन कार्यक्रम व विविध रूग्णालयातील रूग्णांना फळवाटप करून साजरा करण्यात आला.
आमदार मसराम यांची वाढती लोकप्रियता पाहता त्यांचे चाहते वर्ग व मित्र परिवार मसराम यांच्या अत्यंत निकटवर्तीयांच्या वतीने आ.मसराम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक माता वार्ड येथील माता मंदीरच्या सभागृहात रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी तब्बल ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
तर शहरातील अनेक भागात वृक्षारोपन व विविध शासकीय रूग्णालयात रूग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी धनपाल मिसार सर, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी पं.स. सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, सागर वाढई, विसोराचे उपसरपंच संजय करांकर, युकों. तालुका अध्यक्ष अमर भर्रे, माजी युकाँ. तालुका अध्यक्ष पंकज चहांदे, अरूण कुंभलवार, दिनेश कुर्डीकर, भागवत नाकतोडे, युकाँ. अध्यक्ष आरमोरी विधानसभा कमलेश बारस्कर, कैलास वानखेडे, विजय पिल्लेवान, माजी नगराध्यक्ष श्याम उईके, विकास प्रधान, सुनिल सहारे, मोरू मोहुर्ले, खेकारेजी, लंकेश ढोरे, कोंढाळ्याच्या सरपंच सौ. अर्पणा रेशिम प्रधान, सुधाकर राऊत, राऊत, वैष्णवी आकरे, दिलीप घोडाम, मिलींद खोब्रागडे आदी सह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



