Home Social चिमूर येथील प्रगती कॉलनी मध्ये सतत होत आहे तान्हा पोळा उत्सव… —...

चिमूर येथील प्रगती कॉलनी मध्ये सतत होत आहे तान्हा पोळा उत्सव… — बाल गोपालांना मिळत आहे विविध मान्यवरांकडून वेगवेगळे बक्षीस…..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

      चिमूर नप अंतर्गत येत असलेल्या प्रगती कॉलनी मध्ये कंचर्लावार व नागरिकांच्या पुढाकारातून बाल गोपालांना आनंद मिळावा यासाठी तान्हा पोळा उत्सवात साजरा करीत असल्याची प्रथा सुरु आहे.

      आज दिनांक २३ ऑगस्टला प्रगती काॅलनीमध्ये तान्हा पोळा उत्सव आनंदमय वातावरणात संपन्न झालाय.

       प्रगती कॉलोनी च्या वतीने तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात येतो त्या उत्सवातील विजेत्यांना आमदार किर्तीकुमार बंटी भांगडिया यांचे कडून एक सायकल व नप माजी नगरसेविका छाया रमेश कंचर्लावार यांचे कडून एक सायकल असे बक्षीस आयोजित होती.तर इतर बक्षीसे इतर मान्यवर कडून होती.

      आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे कडून तान्हा पोळा मध्ये उपस्थित बाल गोपाल यांना कंपास साहित्य सेट वाटप करण्यात आले.

           तान्हा पोळा बक्षीस वितरण प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीमती रेखाताई मालोदे,नप माजी नगरसेविका छाया कंचर्लावार,श्रीमती सारडा,दुर्गा कैलास धनोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

           तान्हा पोळा उत्सव प्रसंगी संचालन उपरे गुरुजी यांनी केले.या तान्हा पोळ्यात बक्षीस वितरण प्रसंगी चिमूर सहकारी तांदूळ गिरणी संचालक डॉ. संजय बोढे,वडाळा माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद शिरपूरवार,युवा व्यावसायिक हरीश सारडा,रमेश कंचर्लावार आदी मान्यवर उपस्थित होते.