Home Maharashtra विवेकानंद नगर येथे गळफास लाऊन केली आत्महत्या…

विवेकानंद नगर येथे गळफास लाऊन केली आत्महत्या…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

 पारशिवनी :- पारशिवनी तालुकातंर्गत कन्हान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे राहात असलेल्या मोहम्मद राहील वय १६ वर्ष यांनी गळफास घेऊन स्वतःच्या घरी आत्महत्या केली असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

         सदर घटना पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलिस स्टेशन हद्दी अंतर्गत स्वामी विवेवानंद नगर कन्हान येथे घडली.

       त्यांनी काल शुक्रवारी २२ अगस्तला दुपारी ०३.०० वाजताच्या दरम्यान घरातच गळफास लाऊन आत्महत्या केली.काल शुक्रवारला ०३ वाजता घरातील लोकाना गळफास लाऊन दिसल्याने त्याचा वडील रोहित मो.सनिर मो.अब्दुल अजीम यांनी कन्हान पोलिसात घटनेची माहिती दिली.

       या प्रकरणी कन्हान पोलिसांनी तक्रारदार वडीलाच्या तक्रारी वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली व मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे पाठविण्यात आले होते.

    आज सकाळी मृतक युवकांच्या मृतदेहाचे अंतीम संस्कार करण्यात आले असून पुढील तपास कन्हान पोलिस करित आहेत.मात्र मृत्यूचे कारण चौकशीत पुढे येण्याची शक्यता आहे.