Home Social तरूण जैन अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष मोहित आगाशे व सचिव वरूण देशमुख यांची...

तरूण जैन अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष मोहित आगाशे व सचिव वरूण देशमुख यांची निवड… — श्री गणेश मंदिर तान्हा पोळा उत्सव समिती नविन पदाधिकाऱ्यांचे स्वागत….

 निलय झोडे 

  उपसंपादक

दखल न्यूज भारत

 साकोली : मुख्य साकोली शहर गणेश वार्डातील “श्री गणेश मंदिर तान्हा पोळा उत्सव समिती” ची नविन पदाधिकारी आज शनिवार २३ ऑगस्ट २०२५ ला येथे तान्हा पोळा निमित्ताने घोषणा करण्यात आली.

          यामध्ये अध्यक्ष तरूण जैन, सचिव वरूण देशमुख व उपाध्यक्ष मोहित आगाशे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येथील श्री बाल गणेश उत्सव मंडळातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यगणांनी या तिन्ही नविन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत केले आहे. 

           ही अभूतपूर्व निवड यासाठी करण्यात आली की, गणेश मंदिर परिसरातील युवा बाल तरुणांना हिंदू संस्कृतीतील धार्मिक उत्सवाची जाण व्हायला हवी. आणि कार्यकारिणी मंडळ कसे सांभाळले जाते याची माहिती व जाणिव व्हावी हा मुख्य उद्देश होता.

        सदर होतकरू युवा तरूण नेहमीच तान्हा पोळा आणि दहा दिवसीय श्री गणेशोत्सवात सदैव अग्रेसर राहून चढाओढीने प्रथम पुढाकार घेऊन प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम करतात.

          यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र शासन प्रा.प्रेस पत्रकार संघाचे आशिष चेडगे, रवि भोंगाणे, युवा सामाजिक कार्यकर्ता सचिन घोनमोडे, हेमंत भारद्वाज, अशोक गुप्ता, संदीप गुप्ता, आशिष गुप्ता, सुरज डुंभरे, श्री बाल गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष कुणाल देशमुख, राहुल अंदूलकर, अमेय डुंभरे, जयकृष्ण डुंभरे आणि सर्व श्री बाल गणेश उत्सव मंडळ गणेश मंदिर चौक येथील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.