Home देशविदेश नेरी येथील बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या पारंपरिक उत्साहाची उत्तम कार्यपद्धत! — “माझा...

नेरी येथील बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या पारंपरिक उत्साहाची उत्तम कार्यपद्धत! — “माझा गाव,माझा सण….

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादीका 

     चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथील बैलपोळा साजरा करण्याची अनोखी व सन्मानपूर्वक परंपरा अजूनही कायम आहे.

           मौजा नेरी येथील बाजार चौकात दरवर्षी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे.या बैलपोळ्याला सन्मानपूर्वक अनोखी परंपरा आहे.

       हजारो बैल जोड्यांची सजावट करुन मध्यभागी असलेल्या बाजार चौकात शेतकरी बांधव आपापल्या बैलजोड्या आणतात.या हजारो बैल जोडींची पहाणी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य,पोलीस पाटील बारकाईने करतात.

        ज्या बैलजोडींची उत्कृष्ट सजावट असेल त्या जोडींची पारंपरिक पुजा करुन ग्रामपंचायत सरपंच द्वारे त्या बैलजोडी मालकाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिल्या जाते.

        याचबरोबर सजावटी मध्ये दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविणाऱ्या बैलजोडीची सुध्दा सन्मान पुर्वक पुजा केली जाते व या बैल जोडी मालकांनाही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांद्वारे बक्षीस दिल्या जाते.

          यानंतर पारंपारिक शब्दात झडती घेत पोळा उत्सवात जबरदस्त रंगत आणली जाते आणि आनंदाच्या पर्वनीसह बैल पोळा फोडल्या जातो…

       यानंतर बैलजोड्या आपापल्या घरी आणल्या जातात व बैलजोळीचे पाय धुऊन पुजा केली जाते.याचबरोबर बैलजोडीला कुळ्याच्या पात्राळीत जेवन दिले जाते आणि बैल मालकाला शक्तीनुसार रुपयांचा भोजारा दिला जातोय.

        यानंतर बैलजोडीला आपल्या मानलेल्या संबंधितांच्या घरी नेले जातय.बैल जोडींचा उत्सव आटोक्यात आल्यावर पत्नी,पतीला अक्षदा लावून आशिर्वाद घेतय‌.

        तद्वतच नेरी येथे जवळच्या नातेवाईकांना व संबंधितांना अक्षदा लावून आशिर्वादातंर्गत शुभेच्छा आदानप्रदान करण्याची परंपरा नातेसंबंध जपण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचेही दिसून आले आहे..

         बैलपोळा हा असा उत्सव आहे की,शेतकरी बांधव दोन दिवस आपली कामे स्वतःहून बंद ठेवतात आणि बैलपोळा सण विविध प्रकारे मोठ्या आनंदाने साजरा करतात..

         “माझा गाव माझा उत्सव,या पध्दतीने बैल पोळा हा सण साजरा केला जात असल्याने हा सण शेतकऱ्यांसाठी दिमाखदार व स्वाभिमानी असतो..