ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : बँकेच्या ‘कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) योजनेद्वारा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जनधन खाती उघडण्यात चे कॅम्प शाळेत घेण्यात आले. ही खाती उघडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला बँकेकडून एक बॅग भेट देण्यात आली.
हा कार्यक्रम शाळेच्या प्राचार्या श्रीमती भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी श्री. सतिश गोटेफोडे यांच्या उपस्थितीत पार पडला. शाळेचे शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, भारतीय स्टेट बँकेच्या रिजनल बिझनेस ऑफिस, गोंदिया चे व्यवस्थापक श्री. गणेश पुरी, साकोली शाखेचे रिजनल व्यवस्थापक श्री. संजय कवठेकर तसेच व्यवस्थापक श्री. भास्कर चाचेरकर यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना बॅग भेट दिल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बचत करण्याची सवय लागेल आणि त्यांना अर्थव्यवस्थेशी जोडले जाईल, अशी अपेक्षा शिक्षणातील सहभागींनी व्यक्त केली. बँकेच्या सीएसआर फंडातून ही योजना राबविण्यात आल्याने समाजातील बालवर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.



