Home Vidarbha पारशिवनी तहसील कार्यालयाच्या सभागृह मध्ये समाधान दिन बैठक संपन्न…

पारशिवनी तहसील कार्यालयाच्या सभागृह मध्ये समाधान दिन बैठक संपन्न…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-आज मंगलवार दिनांक १९/८/२०२५ ला पारशिवनी तहसील कार्यालयाच्या सभागृहा मध्ये नामदार अँड श्री आशिष जयस्वाल राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने पारशिवनी तहसील कार्यालयाच्या सभागृह मध्ये आढावा बैठक समाधान दिन म्हणून घेण्यात आली या तसेच तहसीलदार साहेब तहसील कार्यालय पारशिवनी यांनी तहसील कार्यालय मध्ये समाधान दिवस आयोजित केले होता. 

       याप्रसंगी नामदार अँड श्री आशिष जी जयस्वाल साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओ एस डी) श्री प्रशांत सांगळे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.

          तसेच तहसीलदार सुरेश वाघचौरे साहेब, गटविकास अधिकारी सुभाष जाधव साहेब, पारशिवनी ठाणेदार रविकुमार थोरात साहेब, नगर पंचायत ची माजी नगराध्यक्ष प्रतिभा कुभलकर तसेच तालुक्यातील संबंधित विभागातील सर्व अधिकारी उपविभागिय अधिकारी वरिष्ठ अधिकारी या समाधान दिवसच्या आढावा बैठकीत उपस्थित होते.

          तसेच राजकीय पक्षातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक या समाधान दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील विविध जनहिताय समस्यांवर चर्चा करण्यात आली. या समस्यांची नोंद घेऊन लवकरच त्या समस्यांच्या निवारण करण्याची माहिती संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली.