म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे.
मानवी जीवनाची मुख्य अंग आहेत.आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय. धार्मिक आणि अध्यात्मिक ही मानवी जीवनाची दोन अंगे स्वतंत्र नसून उप अंग आहेत. सांस्कृतिक अंगाचे हे दोन उप अंग आहेत. याचा अर्थ मानवी जीवनाचे चार प्रमुख अंग आणि दोन उप असे एकूण सहा अंग आहेत.(माझ्या अभ्यासानुसार ).
मानवी जीवनाच्या ह्या सर्व अंगाची माहिती असणे म्हणजे ज्ञान होय. आणि माहिती नसणे म्हणजे अज्ञान होय. आणि या सहाही अंगाचे संशोधन आणि शोध म्हणजे विज्ञान होय.
याचा अर्थ माहिती असणे म्हणजे ज्ञान, माहिती नसणे म्हणजे अज्ञान, आणि असलेल्या माहितीतील शोध आणि संशोधन समजून घेणे म्हणजेच विज्ञान होईल.
शिक्षण घेणे म्हणजे ज्ञान मिळविणे. हे शिक्षण शाळेतून कॉलेजमधून किंवा इतर शिबिर मेळाव्यातून पण मिळते, यास औपचारिक शिक्षण म्हणतात. याशिवाय वाचन करणे, डोळ्याला जे काही दिसेल त्यातून, आणि अनुभवाला जे काही येईल ते ज्ञान म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय. म्हणजेच औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातून माणसाला कळत नकळत ज्ञान हे मिळतच असते.
ज्ञानाचे तीन प्रकार आहेत , ते म्हणजे आय टी एस. म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड सायन्स. म्हणजेच आय टी अँड एस. म्हणजेच माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञान ज्ञानाचे तीन प्रकार. या तिन्ही प्रकारे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे पूर्ण ज्ञान होय. माहिती त्या माहितीचे तंत्र आणि त्या माहितीचे विज्ञान समजून घेतल्याशिवाय परिपूर्ण ज्ञान होत नाही. आणि सर्वच माणसांच्या बाबतीत असे घडत नाही किंवा होत नाही म्हणूनच सारेच माणसे ज्ञानी आहेत असे म्हणता येत नाही. याचा अर्थ जी माणसं माहिती घेतात आणि त्या माहितीच्या मागचे तंत्र मंत्र आणि विज्ञान समजून घेतात, तीच माणसे ज्ञानी असतात, बाकीची सारे अज्ञानीच म्हटले पाहिजे.
ज्ञानाचे मुख्य तीन दरवाजे आहेत, माहिती तंत्र आणि विज्ञान. या तिन्ही दरवाजातून गेल्याशिवाय ज्ञान परिपूर्ण होत नाही. कारण ज्ञानाच्या ह्या तीन शाखा आहेत. औपचारिक शिक्षणात आर्ट कॉमर्स सायन्स असे हे ज्ञानाचे तीन शाखा आहेत. आर्ट शाखा म्हणजे समाजशास्त्रांची शाखा, समाजशास्त्र म्हणजे इतिहास भूगोल, समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र फिलॉसॉफी आणि सायकॉलॉजी. कॉमर्स म्हणजे व्यापार शास्त्र. सायन्स म्हणजे विज्ञान शास्त्र. ह्या सर्व शास्त्राचा अभ्यास म्हणजेच ज्ञान होय. याशिवाय टेक्निकल विषय म्हणजे वैद्यकीय इंजीनियरिंग खगोलशास्त्र आणि भूगर्भशास्त्र. अर्थात या सर्व विषयांचे सर्वसाधारण ज्ञान म्हणजे माहिती आणि सखोल ज्ञान म्हणजे विज्ञान.
माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञान याशिवाय अजून एक ज्ञान आहे ते म्हणजे संस्कार शास्त्र आणि नीतिशास्त्र. या शास्त्राची शाळा म्हणजे कुटुंब आणि समाज होय. नैतिकता आणि संस्कार त्याचे शिक्षण पाठ्यपुस्तकातून पण देता येते, पूर्वी आमच्या लहानपणी शाळेतून पुस्तकामार्फत नैतिकतेचे आणि संस्कार हे दिल्या जायचे पण हल्ली त्याचे औपचारिक शिक्षण बंद झालेले आहे, याबरोबरच नैतिकता आणि संस्काराचे शिक्षण कुटुंबातून शेजाऱ्याकडून गावाकडून समाजा द्वारे मिळायला हवे ते पण मिळत नाही अशी आजची परिस्थिती आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अँड सायन्स हे औपचारिक शिक्षण, यावरच शासनाचा समाजाचा जोर दिसतो आहे, कारण माणसाला भौतिक सुख देणाऱ्या गोष्टीचे शिक्षण यात आहे. परंतु बहुतेक सुकात आनंद समाधान शांती मिळत नसते यासाठी सुसंस्कार आणि नैतिकता महत्त्वाचे असते. नैतिकता अर्थात ही स्थळ काल वेळ सापेक्ष असते, म्हणजेच ह्या तीन गोष्टीनुसार म्हणजेच वातावरण परिस्थिती व्यवस्था अवस्था यावरून नैतिकता ही निर्माण होत असते, नैतिकता आहे तर काल आणि वेळ सापेक्ष जरी असली तरी ती असणे आवश्यक आहे, कारण माणसाला भौतिक सुख मिळणे आणि त्याबरोबर मानसिक सुख मिळणे पण गरजेचे असते त्याशिवाय माणसाचे जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच माणसाच्या जीवनात सुख समाधान आनंद शांती या गोष्टीची आवश्यकता असते त्या माणसाला मिळाल्याशिवाय माणूस स्थिर होत नाही.
याकरिता मानवी जीवनाची जी काही अंगे आहेत त्या सर्व अंगाचे ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजेच माहिती असणे त्या माहितीतील शास्त्र तंत्र मंत्र आणि विज्ञान याची पण सर्वसाधारण माहिती असणे म्हणजेच ज्ञान होय. माणसाला जीवन जगण्यासाठी असे ज्ञान आणि सुसंस्कार असणे गरजेचे आहे नवे ही मानवी गरजच आहे.
जनावराचा माणूस का झाला ? याचे कारण म्हणजे शोध आणि संशोधन या त्याच्या स्वभावामुळे किंवा प्रवृत्तीमुळेच. परंतु आज 21 व्या शतकातही खेळणे म्हणावीशी वाटते की माणूस म्हणून माणसाचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बुद्धीचा वापर करणे म्हणजेच शोध आणि संशोधन म्हणजेच वैज्ञानिक दृष्टी आणि माणुसकीची दृष्टी म्हणजेच मानवता याचा अर्थ विज्ञान आणि मानवता या दोन विषयाला धरून माणूस जर मार्गक्रमन करीत असेल तरच माणूस म्हणून त्याची प्रगती होईल, अन्यथा त्याचा प्रवास परतीचा होईल, म्हणजेच माणसाकडून परत जनावराकडे, अशी त्याची अवस्था होईल,
अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, माहिती कडून संशोधनाकडे, ज्ञानाकडून विज्ञानाकडे, अंधश्रद्धेकडून डोळस श्रद्धेकडे, असा माणसाचा प्रवास सुरू झाला म्हणूनच माणूस हिंसेकडून आयुष्य कडे चालू लागला, जानवर गतीकडून मनुष्य गतीकडे चालू लागला, अशा ह्या पूर्व दिशेच्या प्रवासामुळे माणसाची प्रगती झाली, मी शिंदे कडून समतेकडे.
मानवी प्रगतीचे लक्षण म्हणजे माणूस बुद्धिवादी मानवतावादी अहिंसावादी विज्ञानवादी सहिष्णूवादी समाजवादी सकल जनहितकारी बनणे होय.
याबरोबरच प्रत्येक माणसाने आपापला व्यवसाय इमाने इतबारे प्रामाणिकपणे आणि जीव ओतून करणे, अन्याय अत्याचार सहन करणे, आई-वडील भावंडे कुटुंबीय नातेवाईक मित्र समाज गाव देश यांची प्रति कृतज्ञता भाव ठेवणे आणि तसे वर्तन करणे म्हणजेच नीतिमत्ता होय.
शास्त्रीय तांत्रिक आणि वैज्ञानिक ज्ञानाबरोबरच नैतिकतेचे ज्ञान पण गरजेचे आहे. अशा ज्ञानातच सर्वांचेच सर्व समावेशक हित आहे,याची जाणीव सर्वांना असावी.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक: 19 ऑगस्ट 2025. फोन: 9420912209.


