Home Social प्राथमिक आरोग्य पथक चारभट्टी येथे रक्तदान शिबिर संपन्न.. — अतिसंवेदनशील,अतिदुर्गम आदिवासी...

प्राथमिक आरोग्य पथक चारभट्टी येथे रक्तदान शिबिर संपन्न.. — अतिसंवेदनशील,अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागात सुद्धा तब्बल ७८ मानवसेवा रक्तदात्यांनी केले रक्तदान…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी… 

 दि.14/08/2025 रोजी प्राथमिक आरोग्य पथक चारभट्टी , ता.कुरखेडा , जिवन पाटील नाट मित्रमंडळ , ग्रामपंचायत चारभट्टी, तसेच सर्व तालुका येथील प्रा.आ.केंद्र पुराडा, देऊळगाव,कढोली,मालेवाडा ,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व कृषी कार्यालय, पंचायत समिती कुरखेडा सर्व सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांचा सयुंक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात एकूण 78 लोकांनी स्वयंस्पूर्त रक्तदान करुन आपले लोकहीतार्थ सामाजिक कर्तव्य पार पाडले.

        जनजागृती अभावी रक्तदान सारख्या सामाजिक कार्यात विशेष सहभाग आढळून येत नव्हता. मात्र आता अतिजोखमीचा माता, मलेरिया , डेंगू व इतर रुग्णांकरिता वेळी – वेळी रक्ताची आवश्यकता भासते त्यासाठी त्यांना जवळील पर्याय उपलब्ध नसल्याने जिल्हास्तरावर धाव घ्यावी लागते त्यानुसंगाणे जिल्हा रक्तपेढी येथे रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सदर रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.

        या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी  आमदार रामदासजी मसराम साहेब,जिवन पाटील नाट, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष , प्रभाकरजी तुलावी, गट विकास अधिकारी साहेब , सरपंचा प्रितीताई मडावी, उपसरपंच श्री.सुरेशजी कवाडो, ग्रामविकास अधिकारी श्री. नरेंद्र आंबोने साहेब ,सर्व ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील, तसेच डॉ.सिन्हा मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते..

       यावेळी स्वतः जिवन पाटील नाट व चारभट्टी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत नाकाडे यांनी रक्तदान करून शिबिराला सुरवात केली.

          सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता..डॉ.मेधा चवारे, डॉ.चंद्रकांत नाकाडे, डॉ. विशाल काळे, डॉ. विवेक आकरे ,डॉ.दिनेश नाकाडे, अश्विनी कवासे, प्रशांत सावळे ,डिकेश वाचामी ,कु.प्रियंका रघुते ,कु.जयश्री मस्के, एस जिलेला,सर्व समुदाय आरोग्य अधिकारी , सर्व आरोग्य सेवक महिला /पुरुष ,सर्व आशा स्वयंसेविक ,अंगणवाडी सेविका व सर्व कर्मचारी वृंद, सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले….