Home Social नगर पंचायत कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन लुंगे यांच्या हस्ते करण्यात...

नगर पंचायत कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन लुंगे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण.

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- नगरपंचायत पारशिवनी येथे दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्याचा 78 वर्धापनदिनानिमित्त नगर पंचायत कार्यालय येथे मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन लुंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

        सदर ध्वजारोहण कार्यक्रमास पारशिवनी शहरातील विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका आशा सेविका व नागरिक उपस्थित होते.

          या प्रसंगी नगर पंचायत कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी निखिल ढोले, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरे, पाणीपुरवठा अभियंता सुरज पिंपळकर, लेखापाल जावेद तडवी, लेखापरीक्षक सुमेध बनकर, रचना सहाय्यक सीमा सरवदे, स्वच्छता निरीक्षक निलेश नकाशे शरद पाटील , महेश भनारकर , शहर समनव्यक अ पोहुरकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

         हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत नगर पंचायत कार्यालयात नागरिकांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. गावातील नागरिक व विद्यार्थ्यांनी सदर सेल्फी पॉईंट मधे फोटो घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्साह पाहण्यास मिळाला.

        सदर कार्यक्रमात नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन लुंगे यांनी केले.