अनिलकुमार एन.ठवरे
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
देलनवाडी : प्रधानमंत्री खनिज प्रतिष्ठाण जिल्हा गडचिरोली अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने आमदार निधीतून मौजा देलनवाडी येथे जलशुद्धीकरण व शीतकेंद्र याकरिता ९,९८,७४१/_ रुपये सन २०२३ – २४ या सत्रात निधी मंजूर करण्यात आला.दिनांक १२/०८/२०२४ ला रितसर काम सुरू करण्यात आले.

विशेष बाब म्हणजे या जलशुद्धीकरण व शीतकेंद्राचे माजी आमदार श्री.कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात लोकार्पण सोहळा पार पडण्यात आला.परंतु आजच्या तारखेला हे यंत्र फक्त शोभेची वस्तू ठरलेली आहे.
पावसाळ्यामध्ये नळयोजनेचे पाणी खुपच गढूळ येत असल्यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे हे जलशुद्धीकरण व शीतकेंद्र लवकरात लवकर सुरु करून शुद्ध पाण्याचा नागरिकांना पुरवठा करण्यात यावा अशी रास्त मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



