Home Social सुप्रसिद्ध गायक मनोज कोटांगले यांना संगीतमय श्रद्धांजली…

सुप्रसिद्ध गायक मनोज कोटांगले यांना संगीतमय श्रद्धांजली…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : सुप्रसिध्द कवि, गायक, प्रबोधनकार स्मृतीशेष मनोज कोटांगले यांना विदर्भ स्तरीय कलावंतांकडून संगीतमय श्रध्दांजलीचा कार्यक्रम उद्या दि. १७ आॅगष्ट २०२५ रोज रविवारला एकोडी येथील बाजार चौकातील समाज मंदिरात दु. ३ ते रात्री १० पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. संगीतमय श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कवि गायक यांची उपस्थिती राहील. 

        मनोज कोटांगले हे सुप्रसिद्ध कव्वाल, गायक व कवी होते. १ आगस्ट २०२५ ला अल्पवयात अल्पआजाराने त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कला जगतातील एक तारा निखळल्याची व आंबेडकरी चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता हरवल्याची भावना त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

         त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून संगीतमय श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम सर्व स्तरीय कलावंत, मनोज कोटांगले यांचा मित्र परिवार, कवि, गायक, वादक व एकोडी गावकरी मंडळी यांच्या वतीने आयोजित केला आहे.

          सदर श्रध्दांजली कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने चाहत्यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.