Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — चिमूर तालुकातंर्गत रामपूर ते डोमा – मुग्दाई रस्त्यावर...

ब्रेकिंग न्यूज… — चिमूर तालुकातंर्गत रामपूर ते डोमा – मुग्दाई रस्त्यावर मटेरियल टाकणाऱ्या ट्रक – हायवा चालकांची पत्रकारांबरोबर हुज्जतबाजी! — कोटगाव ते जांभुळघाट आवागमन करणाऱ्या रस्त्यावर ठेवतात ट्रक व हायवा उभे.. — मौजा कोटगाव वाशियांना येण्याजाण्यासाठी होतोय नाहक त्रास… — मुजोरी करणाऱ्या चालकांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायची काय? — संबंधित वाहतूक विभागाने,पोलिस विभागाने,सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता…

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादीका 

      चंद्रपूर जिल्हितंर्गत चिमूर तालुक्यात मौजा रामपूर ते कोटगाव,डोमा ते मुग्दाई रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी ठेकेदारांकडून मटेरियल टाकणे सुरु आहे.

         मात्र रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी मटेरियल टाकणाऱ्या ट्रक व हायवाचे चालक हे मौजा कोटगाव ते जांभुळघाट रस्त्यावर ट्रक व हायवा उभे ठेवत असल्याने मौजा कोटगाव येथील नागरिकांना आवागमन करण्यासाठी नाहक त्रास होत आहे.

         मौजा जांभुळघाट ते मौजा कोटगाव हा रस्ता ओव्हर लोड मटेरियल वाहतूक करण्यासाठी योग्य नसताना या रस्त्यांनी सदर मटेरियलचे ओव्हर लोड ट्रक व हायवा चालतातच कसे?हा प्रश्न आहे.

          मटेरियल वाहतूक करणाऱ्या ट्रक व हायवा चालकांना आपले वाहणे रस्त्याच्या कडेला उभे ठेवत जा असे आज दखल न्यूज भारतचे मुख्य कार्यकारी संपादक उपक्षम रामटेके यांनी सांगितले असता,त्यांनाच,”तुमच्या जे बनते ते करा,मात्र आमची वाहणे आम्ही रस्त्यावरच उभी ठेवू असे उर्मटपणे उत्तर दिले.

            मटेरियल टाकणाऱ्या ट्रक व हायवा चालकांत येवढी उर्मट भाषा कशीकाय येते?या रस्त्याचे ठेकेदार आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे वडील व संबंधित व्यक्ती आहेत म्हणून काय?

         कायदा सर्वांसाठी सारखा आहे.यामुळे क्षमता नसलेल्या मार्गावरुन ओव्हर लोड मटेरियल वाहतूक करणाऱ्या ट्रक व हायवा वाहणावर चंद्रपूर वाहतूक विभागाने व भिसी पोलिसांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई करणेही आवश्यक आहे.

          आवागमन अ़तर्गत मौजा कोटगाव येथील नागरिकांच्या सुरक्षेला बाधा पोहोचविणाऱ्या रस्ता बांधकाम ठेकेदारांवर,संबंधित ट्रक व हायवा चालकांवर कारवाई होणार काय?हा यक्ष प्रश्न चंद्रपूर वाहतूक विभागाला,भिसी पोलिस स्टेशन ठाणेदारांना,आणि चिमूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता यांना आहे!..

       ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना भांडवलदार ठेकेदार कचरा समजतात काय?हा प्रश्न सुध्दा अधिकच गंभीरता निर्माण करतो आहे.

         पत्रकार उपक्षम रामटेके यांच्या सोबत उर्मट भाषेचा उपयोग करणाऱ्या चालकांना ठेकेदारांनी घरी बसवले पाहिजे आणि मौजा कोटगाव येथील नागरिकांचे रक्षण केले पाहिजे असाच घटनाक्रम आहे..

       पत्रकार उपक्षम रामटेके हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे चिमूर तालुका सहसंघटक आहे.