कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे माझी शाळा – माझा उपक्रम अंतर्गत २२ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘ माझा तिरंगा – माझा अभिमान ‘ या उपक्रमाअंतर्गत भारताच्या राष्ट्रध्वजावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली.
भारतीय संविधान सभेने २२ जुलै १९४७ रोजी तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी पहिल्यांदा लाल किल्ल्यावर डौलाने फडकला.राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय प्रतीक असून राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे.

या राष्ट्र ध्वजाची माहिती विद्यार्थ्यांना असावी म्हणून मुख्याध्यापक खुशाल कापसे यांचे संकल्पनेतून माझा तिरंगा माझा अभिमान हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून शाळेत सुरू आहे.
राष्ट्रध्वजाला मिळालेली मान्यता,राष्ट्रध्वजाची डिझाईन,त्याचा आकार,त्यातील रंग,रंगाचे स्थान व प्रतीक यावर आधारित प्रश्नांची बहुपर्यायी स्वरूपातील सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली.
विजेत्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.



