Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — अखेर तिसऱ्या दिवशी मायलेकांचे शव मिळाले..

ब्रेकिंग न्यूज… — अखेर तिसऱ्या दिवशी मायलेकांचे शव मिळाले..

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी.

पारशिवनी:- आपदा मित्र ग्रृप आणि एसडीआरएफच्या जवानाचे मदतीने शोध मोहीमेत आज अखेर तिसऱ्या दिवसी दोघाही मायलेकांचे शव मिळाले.

        आज सकाळ पासुन शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.या शोध मोहीमेत सकाळी ११ वाजता मृत महिला अल्का शेखर बेहुने यांचा शव डुमरी खंडाळाच्या नहरात मिळून आले तर मृतक अरमान शेखर बेहुने यांचा शव चांपा रिठ डुमरी केरडी च्या नहरात चार वाजताच्या दरम्यान मिळून आला. 

      मंगळवार,१२ ऑगस्ट रोजी पारशिवनी पोलीस स्टेशन परिसरातील पेच धरणाच्या भंडारा कालव्यात दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान एक महिला जोरदार प्रवाहात तरंगताना दिसली होती.

       माहिती मिळताच पारशिवनी पोलिसाचे पोलिस निरिक्षक राजेश कुमार थोरात व गोपनिय विभागाचे पृथ्वीराज चौहान यांनी स्थानिक आपदा मित्र ग्रुप आणि एसडीआरएफच्या मदतीने तात्काळ बचाव आणि शोध मोहीम सुरू केली होती. 

      महिलेला वाचवण्याच्या प्रयत्ना दरम्यान,रात्र पडल्यामुळे शोध मोहीम थांबवावी लागली.दुसरे दिवस मंगलवार ला सकाळ पासुन रात्री पर्यंत शोध घेतला असता शव मिळून आले नाही.

       दुसरे दिवसी रात्र झाल्याने शोध मोहीन थांबवली होती आणी आज तिसरे दिवस गुरुवार १४ आगष्टला सकाळीपासुन आपदामित्र व एसडिआर च्या जवानानी शोध घेणे शुरू केले होते‌.

     सकाळी ११ वाजता च्या दरम्यान मृत महिला अल्का शेखर बेहुणे ही डुमरी खंडाळा च्या मागच्या नहरात मिळून आली व मृत मुलाची शोध मोहीम सुरू असताना सायंकाळी ४ वाजता च्या दरम्यान मृत मुलगा अरमान शेखर बेहुणे हा पण डुमरी ते केरडीच्या मधात चांपां गावातील लहान नहरात मिळून आला.

      आपदामित्र व एस डि आर एफ च्या पथक यांनी मृतदेह पारशिवनी पोलीसांच्या सुपर्द केले.त्या नंतर पारशिवनी पोलिसनी घटना स्थळाचा पंचनामा करून ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे शवविच्छादन करिता आणले.या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली होती.