Home Social आलापल्ली ग्रामपंचायतीत विकासकामांवर प्रश्नचिन्ह :- माजी सरपंच अज्जु पठाण यांचे निवेदन… ...

आलापल्ली ग्रामपंचायतीत विकासकामांवर प्रश्नचिन्ह :- माजी सरपंच अज्जु पठाण यांचे निवेदन… — 14 तारखेला ग्रामसभेत पारदर्शक उत्तर दया…अन्यथा आंदोलन छेडणार…

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी  

आलापल्ली : आलापल्ली ग्रामपंचायतीतील विविध प्रलंबित कामे, निधीचा वापर आणि पारदर्शकतेच्या अभावाबाबत माजी सरपंच अज्जु पठाण यांनी सरपंच व सचिवांना लेखी निवेदन देत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

          यामध्ये विशेषतः तेंदुपत्ता मजुरांचे थकित पैसे, बंद पडलेली नळ योजना आणि मागील तीन वर्षांचा निधी हिशेब याबाबत स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे.

१) तेंदुपत्ता संकलन मजुरांचे थकित पैसे

       सन 2024-25 या हंगामात तेंडूपत्ता संकलन करण्यात आल्यानंतरही गरीब जनतेला ग्रामपंचायत व पेसा समितीच्या अंतर्गत येणाऱ्या मजुरांना आजतागायत मजुरीचे पैसे न मिळाल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. यासाठी जबाबदार कोण, तसेच मजुरांना त्वरित पैसे देण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

२) गावातील नळ योजना ठप्प,

       गावात सुरू करण्यात आलेली नळ पाणीपुरवठा योजना गेली काही वर्षे बंद पडल्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. लावलेले पाईप 70% फुटलेले व नीकृष्ठ दर्जाचे होते, काम करणारे ठेकेदारावर करवाई का करण्यात आली नाही? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का, हे ग्रामपंचायतीने स्पष्ट करावे, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

३) मागील तीन वर्षांचा निधी हिशेब

        सन 2022-23, 2023-24 व 2024-25 या तीन वर्षांत ग्रामपंचायतीला आलेला एकूण निधी किती, त्यातून प्रत्यक्षात किती विकासकामे झाली आणि किती निधी शिल्लक आहे, याचा सविस्तर तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील निधी वितरणात आलापल्ली ग्रामपंचायतीचा मोठा वाटा असतानाही विकासकामांची गती मंदावल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.

        माजी सरपंच पठाण यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या तिन्ही विषयांवर तातडीने पारदर्शक माहिती दिली नाही, तर ग्रामपंचायतीच्या कामकाजाविरोधात ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन उभारले जाईल.