Home Social आळंदी ग्रामीण रुग्णालयात २१ जणांचा अवयवदानाचा संकल्प…

आळंदी ग्रामीण रुग्णालयात २१ जणांचा अवयवदानाचा संकल्प…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :– राज्य शासनातर्फे ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘अवयवदान जनजागृती पंधरवडा’ आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत आळंदी ग्रामीण रुग्णालयात तब्बल २१ जणांनी अवयवदानाची शपथ घेतली. ही माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऊर्मिला शिंदे यांनी दिली.

        डॉ.शिंदे म्हणाल्या, “आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार अवयवदान जनजागृतीसाठी आळंदीमध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले. विशेषतः तरुणांना या विषयाची माहिती देऊन त्यांना अवयवदानासाठी प्रेरित करण्यात आले. त्यानुसार २१ तरुणांनी पुढाकार घेत अवयवदानाचा संकल्प केला आहे.”

      दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक स्वरूपात शपथविधी घेण्यात येणार असून, जिल्हा व तालुकास्तरावर सर्व अवयवदात्यांचा पालकमंत्री, आमदार यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. हा उपक्रम नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावणार आहे.