ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्हा साकोली तालुक्याच्या वतीने अखंड भारत दिवस व विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस वैनगंगा पॉलीटेक्निक कॉलेज सभागृह जमनापूर रोड साकोली येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे डॉ. सौ वृंदा करंजेकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की अखंड भारताचे तुकडे कसे झाले व अखंड भारतात कोणकोणते देश होते याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्रकाश पांडे जिल्हा सहमंत्री विहिंप. यांनी म्हटले की भारत मातेच्या शूरवीरांच्या प्रयत्नाने व त्यांच्या बलिदानाने 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाला परंतु तो अर्धवटच कारण, स्वातंत्र्याच्या एका दिवसा अगोदर भारत मातेचे तुकडे करण्यात आले. त्यांनी म्हटले की हिंदू हिंदू मधील तणावामुळे 20 वेळा भारताचे तुकडे करण्यात आले म्हणून आज अखंड भारत ठेवण्याचे आवाहन आपल्यासमोर आहे.
हा दिवस भारताच्या अखंडत्वाच्या आणि एकतेचा संदेश देतो.फाळणीमुळे भारताचे तुकडे झाले पण अखंड भारताचे स्वप्न आजही अनेक भारतीयांच्या मनात जिवंत आहे.अखंड भारताच्या संकल्पनेच्या पुनरुचार केला जातो आणि देशाच्या एक्यासाठी आणि एक अखंडतेसाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.
तसेच विहिंपचे कार्य आणि हिंदू समाजासाठी त्यांनी केलेले योगदान यांचा गौरव यावेळी केला गेला. विहींपच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य ,आणि सामाजिक सेवा यासारख्या क्षेत्रात विशेष योगदान आहे.
मंचावर प्रमुख पाहुणे विहिंपचे जिल्हा उपाध्यक्षा कोकिळा बाळबुद्धे, प्राध्यापक जितेंद्र ठाकूर, अनिल डोंगरवार जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख ,ताराचंद लंजे प्रखंड अध्यक्ष साकोली ,श्रीकांत साबळे जिल्हा संघटन मंत्री ,कल्पना कापगते राष्ट्रसेविका समिती कार्यवाहीका, राजेश कापगते तालुका संघ चालक साकोली इत्यादी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राकेश सेलोकर, अनिल डोंगरवार,प्रफुल बडवाईक, मंगेश कापगते, प्रणित पालीवाल यांनी अथक परिश्रम घेतले.



