Home देशविदेश शिळ्या अन्नातून झालेल्या विद्यार्थ्यांच्या विषबाधेची जबाबदारी कुणाची? — पोष्ट बेसिक शासकीय...

शिळ्या अन्नातून झालेल्या विद्यार्थ्यांच्या विषबाधेची जबाबदारी कुणाची? — पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळा जांभुळघाट येथे पालकांनी घेतली संबंधितांची झळाझळती… — विष बाधित विद्यार्थ्यांना रक्ताच्या उलट्या होणे,त्यांच्या पायावर सुजन येणे व त्यांना चक्कर मारणे असा गंभीर घटनाक्रम…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        चंद्रपूर जिल्हितंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथे पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळा आहे.या शाळेत ५३८ विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी निवासी राहतात.या सर्व निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची व इतर महत्वपूर्ण प्रकारची जबाबदारी मुख्याध्यापक,अधिक्षक-अधिक्षिका,स्वयंपाकी,व इतरांची आहे..

        विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कुठल्याही प्रकारची हयगय करता येत नाही.असे असताना पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना,दिनांक ०८ व दिनांक ०९ आगष्ट २०२५,च्या सायंकाळी शिळे अन्न भोजण्यासाठी देण्यात आले.

        दोन्ही दिवसाच्या शिळ्या अन्नातून तब्बल २६७ निवासी विद्यार्थ्यांना (मुले/मुली) विषबाधा झाली.या विषबाधेची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना होताच त्यांनी जांभुळघाट येथील पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळा गाठली व अन्नातून झालेल्या विषबाधेबाबत संबंधितांची झळाझळती घेतली.

            या झळती अंतर्गत आश्रम शाळेतील संबंधितांनी दिलेले उत्तर पालकांना अमान्य झाले.त्यांनी मुख्याध्यापक व अधिक्षांना चांगलेच धारेवर धरले.

          पण,प्रश्न हा पडतो की,निवासी विद्यार्थ्यांना शिळे अन्न कुठल्या नियमानुसार दिले गेले? विद्यार्थ्यांना शिळ्या अन्नातून झालेल्या विषबाधेला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हयगय का म्हणून करण्यात आली? विद्यार्थ्यांना शिळे अन्न खाण्यासाठी बाद्य का म्हणून केले जातय? विद्यार्थ्यांना का म्हणून मारले जातय? विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना तक्रार करु नये म्हणून त्यांच्यावर दबाव का म्हणून आणल्या जातोय?

       सातत्याने दोन दिवस शिळे अन्न भोजण्यासाठी देण्यात आल्यामुळे तब्बल २६७ विद्यार्थ्यांना झालेली विषबाधा गंभीर घटनेतील बाब आहे.

         या घटनेला मुख्याध्यापक,अधिक्षक/अधिक्षिका,स्वयंपाकी जबाबदार आहेत असेच दिसून येते आहे.या बेजबाबदार सर्वांना पदमुक्त केले पाहिजे असेच संवेदनशील प्रकरण आहे.