Home Maharashtra मौजा सोनसरी परिसरात रानटी हत्तीचा धुमाकूळ… — शेतकरी व नागरिक आले...

मौजा सोनसरी परिसरात रानटी हत्तीचा धुमाकूळ… — शेतकरी व नागरिक आले दहशतीत…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी..

      गडचिरोली जिल्हातंर्गत कुरखेडा तालुक्यातील मौजा सोनसरी परिसरात रानटी हत्तीने धुमाकूळ घातला असून शेतकरी व नागरिक दहशतीत आहेत.

     मौजा सोनसरी परिसरातील शेत शिवारात 3 दिवसापासून रानटी हत्तीचा हौदोस असून वन विभाची धांदल उडाली आहे.

          श्री.पुडलिक शिवणकर,श्री.केसव शिवणकर,श्री.हेमराज शिवणकर,बिर्जी चौधरी,माधव दहिकर,गुणवंत धकाते,पांडूरंग शिवणकर,नरेश कुंजाम,प्रलाद गोटा,सार्जा कूंजाम,हिरालाल बगवा,तीलोचन मेश्राम आदिंच्या शेतातील पिकांचा पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

        राहुल सुरपाम सोनसरी वनरक्षक यांनी रानटी हत्ती मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पंचनामे करावे व नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त रूपये शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी पुढे करण्यात आली आहे. 

        याचबरोबर रानटी हत्तीचा बंधोबस्त करून परिसरातील नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी व जनतेंनी सतर्क राहावे अशी मागणी आहे.