शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चंद्रपूर जिल्हितंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा महादवाडी येथील नागरिकांना नळयोजना द्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.गढूळ पाण्याचा पुरवठा का म्हणून होतोय या संबंधाने महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांनी चिमूर प.स.चे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता यांना वारंवार पत्रव्यवहार केला.
परंतु गढूळ पाणी पुरवठा होणाऱ्या गंभीर समस्येकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चिमूर चे उपविभागीय अभियंता लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरुन विविध योजना राबविण्यात येतात व नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते.
मात्र,महादवाडी येथील नागरिकांना नळयोजना द्वारे अस्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जात आहे.याला जबाबदार ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चिमूरचे उपविभागीय अभियंता,शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता असल्याचे निदर्शनास आले आहे.
वारंवार पत्रव्यवहार करुनही ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चिमूरचे उपविभागीय अभियंता महादवाडीच्या अस्वच्छ पाणी पुरवठ्याकडे त्वरित लक्ष देत नसतील तर ते महादवाडीचे नागरिक दुषीत पाणी पिल्याने आजारग्रस्त झाल्यांवर व मेल्यावर लक्ष देणार आहेत काय?हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरपंच भोजराज कामडी यांनी आरो प्लाॅन्टची मागणी निवेदनाद्वारे केली.परंतू या मागणीकडे सुध्दा दुर्लक्ष करण्यात आले आहे.
यामुळे मौजा महादवाडी येथील नागरिकांना दुषीत पाण्यामुळे धोका निर्माण झाल्यास,सर्व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे सरपंच भोजराज कामडी यांचे म्हणणे आहे.
महादवाडी येथील दुषीत पाणीपुरवठा बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी चिमूर,तहसीलदार चिमूर,उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर, गटविकास अधिकारी प.स.चिमूर,चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष बक्काल यांना सरपंच भोजराज कामडी यांनी पत्रव्यवहार केला आहे.



