Home Vidarbha चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती साठी शासनाला समितीच्या वतीने दिले निवेदन…

चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती साठी शासनाला समितीच्या वतीने दिले निवेदन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

       चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीची अनेक वर्षा पासून ची मागणी प्रलंबीत असून शासन स्तरावर सातत्याने निवेदने देत असून चिमूर क्रांती जिल्हा संघर्ष समितीचे वतीने ५ जानेवारी व ९ ऑगस्ट ला निवेदन देत असतात. आज दिनांक ११ऑगस्ट ला चिमूर क्रांती जिल्हा संघर्ष समिती च्या वतीने निवेदन देण्यात आले.

         अपर जिल्हाधिकारी थीटे व उपविभागीय अधिकारी घाडगे यांना निवेदन देत असतांना केशवराव वरखेडे, प्रा. संजय पिठाडे, डॉ.दिलीप शिवरकर, सुभाष शेषकर, रमेश खेरे, प्रा. महादेव पिसे, डॉ.महेश खानेकर,ऍड. महेशदत्त काळे, ऍड.सोनू श्रीरामे ऍड. सुभाष नन्नावरे, ऍड. शैनेशचंद्र श्रीरामे, ऍड. संदीप हिंगे, ऍड. नितीन रामटेके,ऍड. मुरकुटे, रवी मासुरकर, धर्मदास गेडाम, मोतीराम कुळमेथे, पठाण सर, कैलास रायपुरे सह आदी उपस्थित होते.