दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४,हा काळा कायदा असून सर्व नागरिकांचा महत्वपूर्ण अधिकारांना नाकारणारा आहे व लोकशाही सह नागरिकांचे दमन करणारा आहे.
नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या,”या काळ्या कायद्याचा,विरोध करण्यासाठी मूल शहरात कृती समितीची सभा आज आयोजित करण्यात आली आहे.
संविधान विरोधी म्हणजे सर्व नागरिक विरोधी कायदा रद्द करण्याच्या दृष्टीने राज्यभरामध्ये एक मोठे आंदोलन निर्माण करण्यात येत आहे.याची धग मूल तालुक्यात पोहोचली आहे.
या कायद्यान्वये मुलभूत,धार्मिक,तथा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे.
याचबरोबर संघटन बनवण्याचा,आपल्या अधिकारासाठी,आपल्या शिक्षणासाठी,आपल्या रोजगारासाठी,आपल्या शेतीविषयक हक्कांसाठी,महिलांच्या अधिकार रक्षणासाठी धरणे देणे,आंदोलन करणे,मोर्चा काढणे तर दूरच एकूणच सर्व नागरिकांच्या (महिला/षुरुष) सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याला पूर्णपणे नकारणारे हे विधेयक रद्द करण्यासाठी सर्व पुरोगामी संघटना एकवटल्या पाहिजेत.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ च्या विरोधात आंदोलन उभे करण्याच्या दृष्टीने मुल मधील सर्व पुरोगामी संघटनांनी एक सभा व मार्गदर्शन शिबीर घेण्याचे ठरलेले आहे.
सर्व संविधान प्रेमी,अधिकार प्रेमी व जागरूक नागरिकांची सभा स्थानिक नवभारत विद्यालयात दि.१० आगस्ट ला दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.सभेसाठी न चुकता सर्व समाज घटकांतील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक विरोधक कृती समितीचे वतीने डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी केले आहे.
या सभेत आंदोलनाची दिशा ठरणार असून मान्यवरांचे योग्य मार्गदर्शन लाभणार असल्याचे कळते आहे.



