या पृथ्वीतलावर सारे जग एक होते. जगातील सारे माणसे एकसंघ होती. या व्यवस्थेला समाज संशोधकांनी “आदिम साम्यवादी समाजव्यवस्था “असे नाव दिले. आदिम साम्यवादी समाजव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था की; जिथे देश नाहीत आणि देशाच्या सीमा नाहीत, जिथे वर्ग नाहीत म्हणजेच आर्थिक विषमता नाही, जिथे रंगभेद नाही किंवा जातीभेद नाही म्हणजेच सामाजिक विषमता नाही असा समाज, एकसंघ समाज. अशा व्यवस्थेला संत ज्ञानेश्वरांनी “विश्वचि हे माझे घर ” असे म्हंटले. संत विनोबा भावेंनी ” सब भूमी गोपाल की , म्हणजेच ही भूमी सर्वांचीच आहे कोणी एका व्यक्तीची मालकी किंवा कुण्या एका वर्गाची किंवा कुण्या एका जातीची मालकी नाही, तर पृथ्वीतलावरील जगत भूमी ही सर्वांचीच आहे, असे म्हटले. आणि “जय जगत ” चा नारा दिला. एवढेच नव्हे तर लोकांना विसर पडू नये म्हणून ” जय जगत ” हा शब्द एक नारा म्हणून किंवा अभिवादन म्हणून वापरला, हे कौतुकास्पद आहे.
आदिम साम्यवादी समाजव्यवस्थेत “मालकी ” हा शब्द नव्हता आणि मालकी व्यवस्थापन नव्हती, म्हणजेच विषमता नव्हती. जेव्हा मालकी व्यवस्था निर्माण झाली तेव्हापासून विषमता निर्माण झाली. एक ऐतखाऊ वर्ग आणि दुसरा श्रमिक वर्ग म्हणजे कष्टकरी वर्ग म्हणजेच उपभोगाची साधने आणि वस्तू निर्मिती करणारा वर्ग म्हणजे उत्पादक म्हणजेच श्रमिक वर्ग आणि मालक वर्ग असे दोन वर्ग निर्माण झाले आणि विषमता निर्माण झाली.
बुद्धीचा वापर करणारा बुद्धिस्ट समाज आणि श्रमाचा वापर करणारा श्रमिक समाज, असे दोन समाज या पृथ्वीतलावर निर्माण झाले. बुद्धीचा वापर करणाऱ्याने समाजाच्या टोळ्या निर्माण केल्या आणि ते टोळी प्रमुख झाले. आपल्या बुद्धी सामर्थ्याने श्रमिकांना सैनिक बनवून त्यांच्या शक्तीचा वापर करून एका टोळीने दुसऱ्या टोळीवर आक्रमण करायचे आणि त्या टोळीने संपादित केलेली जमीन आणि संपत्ती आपल्या ताब्यात घ्यायची म्हणजे हे कट ओळीने दुसऱ्या टोळी वर आक्रमण करून त्यांना हरवून आपण जिंकायचे आणि हरलेल्या टोळीला दास म्हणून राबवून घ्यायचे. अशाप्रकारे आधी टोळीप्रथा आणि नंतर दास प्रथा या जगात निर्माण झाली.
पुढे टोळीप्रमुख म्हणजे टोळीचे मालक हे टोळीतील श्रमिकांच्या शक्तीचा वापर करून अनेक डोळ्यांना जिंकून घेऊ लागले म्हणजेच ते साम्राज्यवादी म्हणले. या साम्राज्यवादी भूमिकेतूनच राज्य निर्माण झाले. राज्य आणि राजा ही संकल्पना दृढ झाली. पुढे चालून देश आणि देशाचा राजा आणि त्याचे सैनिक आणि युद्धे लढाया असा प्रकार सुरू झाला. सब भूमी गोपाल की थी परंतु नंतर या भूमीचे देशात रूपांतर होऊन प्रत्येक देशाच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आणि त्या देशाचे संरक्षण करण्यासाठी त्या सीमेवर सैनिक ठेवण्यात आले, ही प्रथा आजतागायत चालूच आहे, मग ते लोकशाहीचे देश असतील की हुकूमशाहीचे हा विषय वेगळा आहे.
विषमतेची उत्पत्ती का आणि कशी झाली? याचे जर चिंतन किंवा संशोधन केले तर असे निदर्शनास येते की, तसे पाहिले तर सर्वच माणसात म्हणजेच प्रत्येकात बुद्धी म्हणजे युक्ती आणि श्रम म्हणजे शक्ती अस्तित्वात आहे, परंतु बुद्धी आणि श्रम याचा गैरवापर करून काही मोजक्या लोकांनी विषमता निर्माण केलेली दिसते.
बुद्धिस्ट म्हणजे बुद्धीचा अतिवापर करणारे आणि श्रमिक म्हणजे श्रमाचा अतिवापर करणारे लोक असे दोन प्रकार जर केले तर त्यात बुद्धीचा वापर करणारे फार कमी लोक जे की ज्यांनी बुद्धीचा गैरवापर करून, बुद्धी आणि श्रम यांची फारकत केली. नुसती फारकत करूनच थांबले नाहीत तर त्यात श्रेष्ठ कनिष्ठता उच्चनीचता आणि वंशभेद असे दुष्ट कृत्य केले, कोणी तिचा वापर केला. भ्रष्ट नीतीचा वापर केला. आणि स्वतः मालक झाले. हे बुद्धिवादी बुद्धिस्ट आणि श्रमवादी श्रमिक असे दोन वर्ग निर्माण झाले. नव्हे दोन विचारसरणी जन्मास आल्या. बुद्धिस्ट हे बुद्धि श्रेष्ठ आहे आणि श्रम हे कनिष्ठ आहे,असा प्रचार सुरू केला. आणि श्रमिका पेक्षा आपण कशी श्रेष्ठ आहोत हे पटविण्याचा आणि दाखविण्याचा प्रयत्न केला, बुद्धीचा गैरवापर करून या बुद्धी श्रेष्ठींनी श्रमिकांना गुलाम बनविले आणि आपण त्यांचे मालक बनले, अशाप्रकारे मालक आणि गुलाम ही व्यवस्था निर्माण झाली, म्हणजेच विषमतावादी व्यवस्था निर्माण झाली.
श्रमाला कनिष्ठ आणि तुच्छ स्थान दिल्यामुळे आणि जे श्रमिक की, जी उत्पादनाची साधने निर्माण करतात म्हणजेच शेती कारखाने निर्माण करतात तसेच माणसाच्या उपयोगाची सर्व साधने वस्तू निर्माण करतात म्हणजेच हे जग उभारतात. देवळे बांधतात, कार्यालय बांधतात, कारखाने उभारतात, शेतीतून आणि कारखान्यातून वस्तु निर्माण करतात, थोडक्यात काय तर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हटल्याप्रमाणे या दोन हाताने हेच श्रमिक यांनी हे सारे जग उभे केले आहे म्हणूनच, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर ठरलेली नसून श्रमिक शोषित दलित वंचित पीडित लोकांच्या तळहातावर ठरलेले आहे अशा प्रकारचा नवा शोध नवा विचार जे वैज्ञानिक आहेत ते अण्णाभाऊंनी सांगितले म्हणून अण्णाभाऊ हे सत्यशोधक ठरले.
बुद्धिवाद्यांनी म्हणजेच बुद्धिस्ट यांनी बुद्धीचा गैरवापर केला तो असा की, माणूस हा क्रमाने मोठा होत नाही तर तो जन्माने श्रेष्ठ होतो, असा चुकीचा शोध लावला, तू चुकीचा आहे हे त्यांना पण माहित आहे पण केवळ स्वतः आयता खाऊ बनण्यासाठी स्वतः मालक बनण्यासाठी म्हणजेच स्वतःच्या स्वार्थासाठी असा हा जावई शोध लावला. आणि त्याचा प्रचार प्रसार करून बहुजन समाजास वेठीस धरले, आणि स्वतः आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मोठे झाले, गब्बर बनले, शोषित बनले, आणि अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. आयशारामात लोळायला सुरुवात केली, नव्हे ऐंशी जिंदगी जगू लागले, आणि श्रमजीवी मात्र हानिकारक त्रासदायक व्यथित जीवन दुखी जीवन जगायला सुरुवात झाली. अशा या व्यवस्थेत सारी सुखे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 15 टक्के अभिजन लोकांच्या पायाशी लोळण घेऊ लागली, आणि सर्व दुःख मात्र 85% असलेल्या एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी या प्रवर्गाच्या वाट्याला आली.
ज्याचा जो व्यवसाय त्याची ती जात असा नियम मनुस्मृतीने तयार केला, साफसफाईची आणि स्वच्छतेची कामे करणाऱ्या लोकांना अस्पृश्य समजले, शेतीत काम करणाऱ्या आणि वस्तू निर्माण करणाऱ्या उत्पादक श्रमिकांना मात्र अस्पृश्य न समजता केवळ त्यांनी उत्पादन करावे मात्र त्याची मालकी ही त्यांची राहणार नाही तर त्या वस्तूवर मालकीही अभिजन म्हणजे 15 टक्क्यांची राहील असा नियम बनविला, 85 टक्क्यांना शिक्षण बंदी केली, व्यापार बंदी केली, संपत्ती बाळगण्याचा हक्क नाकारला, श्रमिकांनी संपत्ती निर्माण करावी परंतु ती त्यांना बाळगता येणार नाही म्हणजेच त्यावर त्यांची मालकी राहणार नाही तर त्यावर मालकी जे श्रमिक नाहीत अशा लोकांची राहील असा नियम केला, बहुजनांना शिक्षण घेता येणार नाही, आणि देव आणि धर्माचा हक्क आणि अधिकार तो फक्त साडेतीन टक्के ब्राह्मणांनाच असेल असा पण म्हणून कायदा केला म्हणजेच मनुस्मृती हे संविधान या देशाला लागू केले आणि तेव्हापासूनच या देशात सामाजिक विषमता दृढ झाली.
सारांश, दुष्ट दुर्जन ठग आणि बुद्धीच्या लोकांनी की जे अत्यंत अल्पसंख्या आहेत अशांनी आपल्या बुद्धीचा गैरफायदा घेतला आणि ज्याचे त्यांनी स्वतःचे राष्ट्र निर्माण केले आणि त्याचे मालक होऊन बसले आणि त्या देशातील बहुसंख्य लोकांना श्रमिक बनविले आणि सैनिक बनविले. श्रमिक हे या आयत खाऊ मालकांचे भरण पोषण करतात आणि सैनिक हे ऐश करणाऱ्या मालकांचे संरक्षण करतात.
अशाप्रकारे विषमतावादी व्यवस्थेची ही उत्पत्ती आणि हे परिणाम आहेत. यातून मात्र अजून एक परिणाम झालेला दिसतो तो म्हणजे असा की या जगात दोन परंपरा निर्माण झाल्या,1 श्रमणवादी परंपरा आणि त्या परंपरेची श्रमणवादी विचारसरणी म्हणजेच समतावादी व्यवस्थेचा पुरस्कार करणारी विचारसरणी.2 विषमतावादी व्यवस्थेचा पुरस्कार करणारी विषमतावादी विचारसरणी, विषमतावादी परंपरा म्हणजेच विषमतावादी विचार प्रवाह. अशा दोन व्यवस्था आणि असे दोन विचार प्रवाह सुरू झाले, ते स्वतंत्रपणे आपापल्या जागी स्थिर नसून ते म्हणजे हे दोन प्रवाह परस्पर विरोधी आहेत, त्यामुळे क्षमतावादी प्रवाह आणि विषमतावादी प्रवाह यांच्यातील पूर्वापार संघर्ष चालूच आहे. म्हणूनच क्रांती आणि प्रतिक्रांती ही होतच राहणार आहे कारण ” परिवर्तन ” हा निसर्गाचा नियमच आहे.असे असले तरी समतावादी विचाराचा प्रभाव जो पर्यंत असेल तो पर्यंत समता टिकेल,हे पण सत्य नाकारता येत नाही.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 9 ऑगस्ट 2025.फोन : 9420912209.



