Home Maharashtra “तिडीक,या कवीतासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नांदेड येथे १० आगष्टला… — प्रकाशन समारंभाचे...

“तिडीक,या कवीतासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नांदेड येथे १० आगष्टला… — प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष असणार प्रा.अनंता राऊत..

    उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक…

      उमेश बालाजी राजभोज लिखित,”तिडीक,या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या १० आगष्टला पिपल्स काॅलेज नांदेड येथे दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.

      कविता संग्रह प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा.अनंता राऊत असणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.आर.एस.जाधव (पिपल्स काॅलेज नांदेड),हे असणार आहेत.

       विशेष अतिथी म्हणून नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार व नांदेड येथील साहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे हे असणार आहेत.

        मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ.प्रकाश मोगले नांदेड,डॉ.संध्या रंगारी हिंगोली,हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 

          “तिडीक,कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहण्याचे विनंती पुर्वक आवाहन लेखक व परिवारातील सदस्यांनी केले आहे.

      या प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचलन श्री.प्रबुध्द काळे करणार आहेत.