Home Maharashtra सत्तेच्या मोहाची लाळ :- अनंत दा.राऊत 

सत्तेच्या मोहाची लाळ :- अनंत दा.राऊत 

  ज्याच्या तोंडातून गळत राहते 

 सत्तेच्या मोहाची लाळ 

  त्याच्या काळजाला लागलेला असतो 

अस्वस्थ वखवखलेला जाळ 

  तत्त्व स्वत्व नीती मूल्यांना 

राजरोस घालतो तो चुलीत 

 सत्तेसाठी घेतो मग हातात 

कुणीही दिलेलं घातकी कोलीत

फलित मिळतं सत्तेचं त्याला 

सार्वजनिक तिजोरीवर 

 घालतो मग घाला 

रट्टावून ओरबाडतो 

सारं सारं काही 

जगायला लागतो मग 

जीवन शाही शाही 

पण मारून टाकत असतो तो 

मूल्य लोकशाही

 असलेच लाळगाळे आज 

माजलेत अफाट

लोकही बेफाट 

त्यांच्यावरच भुलतात

त्यांच्याच तिजोरीत 

मतधन टाकून 

त्यांच्याकडेच पाच वर्षे 

भीक मागत राहतात