Home Maharashtra आळंदीत गणेशोत्सव निमित्त पोलीस विभागाची नियोजन बैठक संपन्न…

आळंदीत गणेशोत्सव निमित्त पोलीस विभागाची नियोजन बैठक संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आखण्यासाठी सर्व गणेश मंडळे, शांतता समिची पोलीस विभागामार्फत महत्त्वपूर्ण बैठक आळंदी पोलीस स्टेशन मार्फत पार पडली.

        या बैठकीस चाकण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्रसिंग गौर, आळंदी नगरपरिषदचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, वाहतूक विभागाचे सतीश नांदुरकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.नरके, मा.सभापती विलास कातोरे, डि.डि.भोसले पाटील, अजित वडगावकर, प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, संजय घुंडरे, युवराज वहीले, उत्तमराव गोगावले, मच्छिंद्र शेंडे, आदित्य घुंडरे, युवराज वहीले, नानासाहेब कुऱ्हाडे, काळुराम गावडे, निसारभाई सय्यद, पुष्पाताई कुऱ्हाडे, नियतीताई शिंदे, संगिताताई फपाळ, संकेत वाघमारे, पोलीस कर्मचारी, नगरपरिषद प्रशासन, विद्युत विभाग, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि स्थानिक स्वयंसंस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        बैठकीत दरवर्षीप्रमाणे सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे, विसर्जन मिरवणुकीसाठी निश्चित मार्ग व वेळापत्रक पाळणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

        यावेळी राजेंद्रसिंग गौर यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे आणि गणेश मंडळांनी देखील नियम व कायद्यांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियमन, आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीनेही विविध सूचनांची माहिती देण्यात आली.

        गणेशोत्सव काळात शंभर टक्के अनुशासन आणि समन्वय राखून हा सण सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.