Home Social सय्यद नावेद यांचा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार” मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यालयात...

सय्यद नावेद यांचा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार” मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यालयात सत्कार…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक 

         सामाजिक कार्य आणि उत्कृष्ट पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दर्यापूर येथिल सय्यद नावेद यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने नुकतेच नागपूर येथे गौरविण्यात आले. या गौरवाचा विशेष सोहळा दर्यापूर येथिल काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

          याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भालसाकळे यांच्या हस्ते सय्यद नावेद यांना शाल, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

          कार्यक्रमात अनेक मान्यवर व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी दर्यापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, अमरावती जिल्हा काँग्रेसचे महासचिव ईश्वर बुंदीले,दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिश शिरभाते,दर्यापूर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जम्मूभाई पठाण,इरफान इनामदार,दत्ता कुंभारकर,सनाल्ला शहा,विनोद वानखडे,सय्यद रेहान,अज्जू पठाण,नंदू गावंडे, असलम मन्सूरीआणि अन्य काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भरभराट शुभेच्छा दिल्या.

         या सत्कारामुळे सय्यद नावेद यांच्या सामाजिक कार्याची आणि पत्रकारितेतील योगदानाची अधिक व्यापक प्रमाणात दखल घेतली गेली आहे.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले.