Home उपक्रम पीएम किसान उत्सव दिनाचे आयोजन…

पीएम किसान उत्सव दिनाचे आयोजन…

ऋषी सहारे 

  संपादक

कुरखेडा :- देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दोन ऑगस्ट हा दिवस आनंददायक ठरला कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वाराणसी येथून वितरण केले.

        यावेळी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून जमा करण्यात आली. सन 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे. 

          योजनेच्या 20 व्या हफ्त्याच्या वितरण दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत भगवानपूर येथे पीएम किसान उत्सव दिनाचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुरखेडा यांच्या वतीने आयोजन करण्यात आले. आयोजनात योजनेच्या वितरणाचा कार्यक्रम उपस्थित शेतकऱ्यांना दृकश्राव्य साधनांच्या मदतीने दाखवण्यात आला.

         योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपआपली इकेवायसी,आधार सीडिंग,तसेच ॲग्रीस्टॅग अंतर्गत नोंदणी आवश्यक असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

          यावेळी ग्रामपंचायत भगवानपूर च्या सरपंचा भारती कुमोटी,सहाय्यक कृषी अधिकारी कनिष्क वाघमारे, ग्रामपंचायत अधिकारी मिसार व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.