ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
नागपूर : दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच या संस्थेला विविध अडचणीचा सामना करावा लागला.अशाच एका आर्थिक संकटाच्या काळातील प्रसंगाची आठवण भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी झालेल्या हीरक महोत्सव सोहळ्यात सांगितले.
गवई म्हणाले एका काळी शिक्षक व कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी महाविद्यालयाकडे पैसे नव्हते अशावेळी भूषण गवई यांचे वडील दादासाहेब गवई आणि दीक्षाभूमी स्मारकाचे पदाधिकारी असलेले दादासाहेब कुंभारे यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचे वडील उद्योजक मनोहर भाई पटेल यांची मदत मागितली. आणि मनोहर भाई पटेल यांनी या दोघांना गोंदियाला बोलविले आणि म्हटले तुम्ही दोघी माझ्याकडे जेवायला या नंतर मदतीचा विचार करेल.नंतर दोघेही जेवायला गेले आणि त्यांनी महाविद्यालयाला आर्थिक आवश्यक मदत दिली असे गवई यांनी सांगितले.
या मदतीने संस्थेला मोठा दिलासा मिळाला आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढता आला. त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आज या स्थानावर पोहोचली आहे असे यावेळी म्हटले.
दीक्षाभूमी स्मारक समिती संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी सोहळा शनिवारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर ,स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सूरेई ससाई ,डॉ. कमलताई गवई आदींच्या उपस्थितीत पार पडला.



