Home Vidarbha किशोर नवले “उत्कृष्ट”मंडळ अधिकारी म्हणून सन्मानित!.. — तहसिलदार रेणूका कोकाटे यांनी...

किशोर नवले “उत्कृष्ट”मंडळ अधिकारी म्हणून सन्मानित!.. — तहसिलदार रेणूका कोकाटे यांनी केला नवलेंचा सत्कार!..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

     बल्हारपूर महसूल उपविभागाचे मंडळ अधिकारी किशोर नवले यांना उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

     १ ऑगष्ट रोजी बल्हारपूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात त्यांना तहसिलदार रेणूका कोकाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले.

      महसूल दिनाच्या अनुषंगाने तहसिल कार्यालय बल्हारपूर व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्तीक विद्यामाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      या पूर्वी देखील चंद्रपूर तालुक्यातील घूग्गूस येथे नवले मंडळ अधिकारी असतांना त्यांना एक उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे हे विशेष!