Home Social मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- मराठा आंदोलनाचे प्रतीक व सामाजिक न्यायासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाच्या स्वरूपात भव्य रक्तदान शिबिराचे आळंदीत सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आले.‌

       रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे शेकडो तरुणांनी सहभाग घेतला. युवकांनी समाजाप्रती आपले कर्तव्य म्हणून रक्तदान करून या उपक्रमाला यशस्वी केले. यावेळी “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाचा जागर करण्यात आला. आयोजकांनी नोंदवले की, संकलित झालेले रक्त विविध शासकीय व खासगी रुग्णालयांना विनामूल्य पुरवण्यात येणार आहे.

        मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आणि सांगितले की, “आपला वाढदिवस केवळ साजरा न होता, समाजासाठी उपयुक्त ठरावा हा हेतू होता. रक्तदान हे जीवनदान आहे, आणि या निमित्ताने आपण अनेकांना नवजीवन देऊ शकतो.

          “यावेळी डी.डी.भोसले पाटील, राहूल चव्हाण, जालिंदर महाराज भोसले, भागवत शेजूळ, अरुण कुरे, सोमनाथ काळे, सुहास सावंत, बालाजी शिंदे, श्रीकांत काकडे, शशिकांराजे जाधव आदींनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.