निर्मोही म्हणजे कसल्याच प्रकारचा मोह नसणे,निर्दोष म्हणजे कसल्याही प्रकारचे दोष नसणे,निष्पाप म्हणजे कसल्याही प्रकारचे वाईट विचार मनात न येणे,असे जीवन म्हणजे निर्मोही निर्दोषी निष्पाप जीवन होय.
असे जीवन जगणारा एखादा तरी माणूस या जगात सापडेल का ? या प्रश्नाचे उत्तर ” नाही “. असेच असणार.याचे कारण म्हणजे माणूस हा संसारे आणि व्यवहारी आहे.
माणसाला निसर्गानेच स्वार्थ नावाची गोष्ट दिलेली आहे.वित्वर पोटाची खळी भरण्यासाठी माणूस मर मर मरतो,आपली शारीरिक भागवण्यासाठी लग्न करतो,लग्नामुळे स्त्री-पुरुष यांचे संबंध येतात.त्यातून मुले जन्माला येतात आणि त्याचा संसार सुरू होतो,त्यांचे कुटुंब निर्माण होते,कुटुंब सांभाळण्यासाठी अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तो चांगले वाईट नाना प्रकारचे कर्म करीत असतो म्हणजेच कार्य सुद्धा करतो.
संसारासाठी स्वार्थ हा करावाच लागतो,अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला स्वार्थी बनावेच लागते.
माणूस कितीही पापी असला तरी त्यास पुण्य कशाला म्हणावे हे त्याला नक्की माहीत असते,तरीपण संसार करण्यासाठी त्याला नको त्या गोष्टी कराव्या लागतात,त्यामुळे त्याची इच्छा नसताना पण संसाराच्या या स्वार्थामुळे त्याचे हातून कळत म्हणा किंवा न कळत पाप हे घडतच असते.
उदा.चोरी करणे,भांडण करणे,मारामारी करणे,खोटे बोलणे,व्यसन करणे,परस्त्री गमन करणे या पंचशीलाचे उल्लंघन करण्याची वेळ माणसावर येते,याला कारण त्याची विषम परिस्थिती असते.
पाप पुण्याच्या कल्पना घेऊन तो जगत असताना त्याला या दोन्हीपैकी कोणता तरी एक विचार घेऊन चालता येत नाही.कारण संसार म्हणजे स्वार्थ आलाच.आणि स्वार्थ म्हणजेच मोह माया.
शारीरिक भुकतर सगळ्यांनाच असते,ती भागविण्यासाठीच स्त्रीचा संबंध यावा म्हणून लग्न करायचे असते,परंतु शारीरिक भाऊ भागविण्याची क्षमता त्यांची नसेल तर त्यांनी काय करायचे?याचे उत्तर कोणाकडेच नसते.
अशावेळी पाप पुण्याच्या भोवऱ्यात माणूस अडकून पडतो,याशिवाय अजूनही अशी काही कारणे असतात की माणसाला इच्छा नसताना सुद्धा म्हणजे त्याची अशी मजबुरी असते की,त्याची इच्छा नसताना सुद्धा त्यास चोरी करावे लागते, भ्रष्टाचार करावा लागतो,अन्याय अत्याचार करावा लागतो,खोटे बोलावे लागते,व्यसन करावे लागते,परस्त्री परमन परपुरुष या गोष्टी कराव्या लागतात.याला कारणीभूत माणूस नसून किंवा त्याचे विचार नसून ” परिस्थिती ” कारणीभूत असते.
हे माहीत असून सुद्धा समाज अशा अडचणीत आलेल्या माणसाला मदत करणे ऐवजी किंवा सांभाळून घेण्याऐवजी त्याला दोष देत असतो,पाप पुण्याच्या ओझ्याखाली माणूस वावरत असताना त्याला नक्कीच निर्मोही निर्दोषी निष्पापी जीवन जगावेसे वाटते,परंतु सम परिस्थितीत हे सारे शक्य आहे आणि त्याच्याभोवती विषम परिस्थिती असेल तर त्याला पाप पुण्याचा या कल्पनांच्याही पलीकडे जाऊन जीवन व्यतीत करणे ही त्याची मजबुरी ठरते.
हे मात्र चांगलेही लोक समजून घेऊ शकत नाही किंवा वाईटही लोक समजून घेत नाहीत,हीच तर खरी खंत आहे.अशावेळी हे सारे जग नाटकी आहे असेच म्हणावेसे वाटते.
कारण पाप करणारे लोक हे आम्ही किती पुण्यवान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात,आणि पुण्य करणारे लोक हे पडद्याआडून पाप करत असतात,ही वस्तुस्थिती आहे,हे सगळ्यांनाच माहित आहे, तरी गप्प का बसत नाहीत? हा खरा प्रश्न आहे,आणि याचे उत्तरही कोणाकडे नाही.त्याचे कारण लोक सत्यवादी जरी असले तरी वास्तववादी नाहीत असेच म्हणावे लागेल.
इथे या विषयाचे चिंतन करीत असताना,अजून एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे,ती म्हणजे या विश्वातील जीवसृष्टी किंवा निर्जीव सृष्टी म्हणजेच पशु पक्षी प्राणी किडे माणूस वनस्पती,तसेच माती,पाणी,वारा अग्नी,हवा ही पंचमहाभूते म्हणजेच निर्जीव जग,असे हे सजीव आणि निर्जीव हे निसर्गाचीच निर्मिती आहे,
त्यामुळे निसर्गाचे प्राकृतिक असणे,म्हणजेच निसर्गाचे प्राकृतिक गुण म्हणजेच शीत,वात,पित्त म्हणजेच जल,वायू,अग्नी,म्हणजेच कफ,वात,पित्त हे शारीरिक गुण हे निसर्गाचे गुणसूत्र निसर्गाकडूनच माणसात किंवा कोणत्याही जीवात आलेले आहेत.
हे विज्ञान शास्त्र,निसर्गशास्त्र,शरिरशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे,हे एकदा कळले,की मग ब्रह्मचर्य पाळणे किंवा ते शक्य नसणे याचे उत्तर सापडते.
म्हणजेच या विश्वातील सारी माणसे हे पित्त वात आणि कफ ह्या त्रिगुणांनी युक्त असे आहेत,याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीमध्ये मग ती स्त्री असो की पुरुष,प्रत्येकात हे नैसर्गिक स्त्री गुण विराजमान असतातच.
परंतु असे असले तरी ज्या व्यक्तीमध्ये शीत गुणाचे प्रमाण जास्त आहे असा व्यक्तीच ब्रह्मचर्य वृत्त पालन करू शकतो,अन्य व्यक्ती नाही.
म्हणून म्हणून म्हणून जे कोणी महाराज किंवा संन्याशी किंवा साधू याने ब्रह्मचर्याचे कितीही पालन करण्याचा प्रयत्न केला आणि जर त्याची प्रकृतीही पित्त प्रकृती असेल तर त्याचे ब्रह्मचर्य पालन करणे शक्य नाही,म्हणूनच ह्या त्यांच्या पित्त प्रकृतीमुळे म्हणजे अग्नी हा गुण त्यांच्यामध्ये जास्त असल्यामुळे त्यांचे ब्रह्मचार्य टिकत नाही.
उदा.12 वर्ष तपश्चर्य करूनही काही ऋषी मेनका रंभा या रूपवती कलावंतीण चे मागे लागले,त्यांना भोगले.ज्यांची तपश्चर्या भंग झाली असे कितीतरी उदाहरणे देवधर्माच्या पोथी पुराणाच्या जगात सापडतात.
याचे कारण हे त्या ऋषींच्या दोष नसून त्यांची प्रकृतीच पित्त प्रकृती असल्यामुळे असे घडले किंवा असे घडू शकते,या उलट अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काहींनी ब्रह्मचर्याचे पालन केलेले आहे त्याचे कारण म्हणजे त्यांची शीत प्रकृती होय.
आणि संसार करून परमार्थ साधणारे मात्र सारेच आहेत,कारण बहुतांशी लोकांची प्रकृतीही वातप्रकृती असते.आणि त्यांचे पित्त वातक हे त्रिगुण समान रूपात असतात म्हणूनच ते ब्रह्मचर्याचे पालन करणे किंवा न करणे यामध्ये बसत नाहीत.
आता माणूस खोटे का बोलतो,चोरी का करतो,अर्थात त्याची इच्छा नसताना सुद्धा तो असे का वागतो? त्यावर भांडणे मारामाऱ्या कोर्टकचेऱ्या करण्याची वेळ का येते? या जगात गुन्हेगारी का वाढते ? याचे कारण त्यांचे वर झालेले संस्कार हे जरी खरे असले आणि चांगले संस्कार होऊ नये जेव्हा माणसे चोऱ्या करतात खोटे बोलतात अर्थात लहान चोर मोठा चोर,मोठा लबाड छोटा लबाड हे आलेच.
याचे कारण म्हणजे भौतिक परिस्थिती होय,म्हणजेच विषमता हे याचे मूळ कारण आहे.ही व्यवस्थाच अशी आहे की या व्यवस्थेत आर्थिक सामाजिक राजकीय विषमता आहे,म्हणजेच समता नाही,याचे कारण उत्पादनाची साधने म्हणजेच शेती कारखाने उद्योग कंपन्या हे व्यक्तिगत मालकीचे आहेत,आणि माणूस मुळात हा स्वार्थी असल्यामुळे शिवाय स्वार्थ तो कंट्रोल करू शकत नाही म्हणून तो निर्मोही राहू शकत नाही.
त्याला त्याच्या भोवतीच्या साऱ्या परिस्थितीचा मोह होतो, म्हणजेच गरिबाला श्रीमंत व्हावेसे वाटते,आणि वरिष्ठ जातीच्या माणसाला कनिष्ठ जातीच्या माणसापेक्षा मी श्रेष्ठ आहे असे वाटायला लागते,परिणामी श्रेष्ठ कनिष्ठता,उच्चनीचता,वैयक्तिक मालकी,त्यासाठी वंशाचा दिवा,म्हणजेच वंश व्यवस्था,म्हणजेच घराणेशाही आणि त्यातून राजेशाही जन्माला येते,अशाप्रकारे विषमतावादी व्यवस्था निर्माण होते,ज्या व्यवस्थेत गरीब मध्यम श्रीमंत असे वर्ग आहेत,जातीभेद आहेत,धर्मभेद आहेत,राजकीय असमतोल पण आहे,अशी व्यवस्था असल्यामुळे इथे कोणालाही न्याय मिळत नाही,याचा अर्थ ही अन्यायी व्यवस्था आहे,म्हणजेच यामुळेच अशा व्यवस्थेत गरिबी बेकारी भ्रष्टाचार अत्याचार असे प्रश्न निर्माण होतात.
अशा अवस्थेत कोणताही माणूस निर्मोही निर्दोष निष्पाप राहू शकत नाही,हे वास्तव सगळे जगत असतात,तरीपण स्वतःच्या गुन्हेगार मनाचे किंवा विचाराचे सांत्वन करण्यासाठी मग देव,धर्म प्राप्त,पुण्य,स्वर्ग,मृत्यू,कर्म,दैव ह्या सगळ्या गोष्टीचे ब्रम्हांड निर्माण करून सारेजन एक तर स्वतःच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा आपल्या पापावर पांघरून घालत आहेत अशी अवस्था या विषमतावादी व्यवस्थेची झालेले आहे.
अशा डुप्लिकेट जगात वावरायची नसेल आणि खरोखर निर्मोही निर्दोष निष्पाप जीवन जगायचं असेल तर कार्ल मार्क्स आणि गौतम बुद्धाच्या विचाराचा सर्वांनीच अवलंब केला पाहिजे,तरच माणसाला आनंद,सुख,शांती,समाधान लाभेल.अन्यथा जशी आहे तशी चालू द्या.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक: 2 ऑगस्ट 2025. फोन: 9420912209.



