Home Maharashtra चिमूर तालुक्यात मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत फार्म संगणीकृत करतांना अपलोड करण्यास...

चिमूर तालुक्यात मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत फार्म संगणीकृत करतांना अपलोड करण्यास होत आहे अडचण निर्माण :- उपसरपंच अशोक चौधरी…. — पालक मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर..‌.

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

        चिमूर तालुक्यात मागेल त्याला सोलर पंप योजनांतर्गत फार्म संगणीकृत करतांना अपलोड करण्यास अडचण निर्माण होत आहे.या अळचणीमुळे शेतकरी परेशान झाले असल्याचे मत शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांचे आहे.त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता तहसीलदार चिमूर यांना निवेदन दिले.याचबरोबर वरिष्ठांना त्यांनी निवेदन पाठवले आहे.

         शासन शेतक-यांच्या हितासाठी व विकासासाठी नवनविन योजना राबवित असून योजनाचा लाभ घेतांना मात्र शेतक-यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.

         सध्या चिमूर तालुक्यात मागेल त्याला सोलर पंप योजना फार्म संगणीकृत करतांना सेतू केंद्रावर शेतक-यांना नाहक हेलपाट्या घालाव्या लागत आहे.

        परंतु एकाही शेतक-यांचे सोलर पंप योजनेचा फार्म पूर्णत्वास गेलेला नाही.सेतू केंद्रधारक हे सदर योजनेचा फार्म भरतांना अडचण येत असल्यामुळे ते सुध्दा त्रासून गेले आहेत व ते शेतक-यांना म.रा.वि.वि.कंपनीच्या कार्यालयास याबाबत संपर्क साधावा असे सांगताहेत.

         त्यानुसार चिमूर तालुक्यातील सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकरी पायपिट करीत म.रा.वि.वि. कंपनीच्या कार्यालयाकडे जावून आपली व्यथा मांडत आहे. 

       सदर म.रा.वि.वि. कंपनीचे अधिकारी/कर्मचारी हे मात्र आणखी थोडे दिवस थांबा असे सांगून शेतक-यांना परत पाठवित आहेत.

       एकीकडे निसर्ग हा हवामानाच्या बाबतीत शेतक-यांना साथ नाही आणि दुसरीकडे शेतक-यांकरीता असलेल्या शासनाच्या योजनेचा उचित लाभ मिळत नाही.यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. 

       सदर योजनेबद्दल शेतक-यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला असून शासनाच्या योजना या केवळ दिखाव्यासाठी आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

      सदर योजनेबाबत आपण आपले स्तरावरुन संबंधीतांना निर्देश देवून शेतकऱ्याचा होणारा त्रास कमी करण्यास सहकार्य करावे,अशी विनंती तहसीलदार चिमूर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

        निवेदनाच्या प्रति डॉ.अशोकजी उईके,पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा,जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.