Home उपक्रम हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत सीडबाल माध्यमाने रोपवन…

हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत सीडबाल माध्यमाने रोपवन…

ऋषी सहारे 

  संपादक

आरमोरी :- तालुक्यामध्ये 17 पेसा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा पेसा मोबिलायझर यांचे मार्गदर्शनात शाळेतील मुलांचं सहकार्य घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे बिया गोळा करून त्यात मातीचे सीड बॉल तयार करण्यात आले.

        प्रती ग्रामपंचायत 2000 याप्रमाणे 17 पेसा ग्रामपंचायत मध्ये तालुक्यातील एकूण 30000 सीडबाल तयार करण्यात आले. माहे जून व जुलै मध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत सदर सीटबाल जंगलातील मोकळ्या जागेत जिथे झाडांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी फेकण्यात आले.

       तसेच 22 जुलै 2025 रोजी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान या उपक्रमांतर्गत सुद्धा ग्रामपंचायत कोरेगाव येथे सीटबॉल विद्यार्थ्यामार्फत फेकण्यात आले. अशा प्रकारे पंचायत समिती आरमोरी अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली व गटविकास अधिकारी तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनात सदर नाविन्यपूर्ण उपक्रम पंचायत समिती आरमोरी अंतर्गत 17 पेसा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा पेसा मोबिलायझर यांचे सहकार्याने राबविण्यात आला.