दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे – एसटी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
एस.टी. कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, बाबा आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, “कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य शासनाने दिले. एसटी स्थानकांचा PPP माध्यमातून दीर्घकालीन (९८ वर्ष) विकास होणार आहे. ई-बससेवेसही प्रोत्साहन दिले जात आहे.”
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, “कामगारांना देशातील सर्वाधिक वेतन मिळते. स्थानकांचे स्मार्ट बस पोर्टमध्ये रूपांतर आवश्यक आहे.” कार्यक्रमात ताटे दांपत्याचा सन्मान करण्यात आला.



