Home देशविदेश परभणी प्रकरणातंर्गत त्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर केव्हा फौजदारी कारवाई होणार? ...

परभणी प्रकरणातंर्गत त्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर केव्हा फौजदारी कारवाई होणार? — सर्वोच्च न्यायालय व संभाजी नगर खंडपीठ म्हणतय गंभीर प्रकरण….

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक…

      परभणी प्रकरणातंर्गत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई खंडपीठातंर्गत संभाजी नगर (औरंगाबाद) उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.या आदेशाचे पालन परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक केव्हा करणार?हा प्रश्न अख्या महाराष्ट्रातील जनता विचारते आहे. 

         सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणातंर्गत महाराष्ट्र राज्याचे अपिल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे व संभाजी नगर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे.यामुळे महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे जनमत आहे.

       आजपर्यंत कुठलाही मुख्यमंत्री इतका खोटं बोललेला नाही “असं गेल्याच आठवड्यात सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई यांनी सांगितलं होतं.आणि हे खरं ठरलं…

       सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. 

      या निर्णयामुळे पोलिसांच्या चुकीच्या आणि जीवघेण्या कृत्याची पाठराखण करणाऱ्या सरकारला दणका बसला आहे.

       सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर आठवड्याभराच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. 

       मात्र यानुसार सरकारने कारवाई केली नाही.त्यामुळे याप्रकरणी गुन्हा करणाऱ्या पोलिसांना सरकार पाठबळ देत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

       विधिमंडळात हा विषय उपस्थित झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात “सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची दोन कारणे शवविच्छेदन अहवालात पुढे आली आहेत.

       त्यामुळे याबाबत अंतिम अहवाल आल्यानंतरच निष्कर्ष काढला जाईल,असे सांगितले होते.

      यानंतर राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.उच्च न्यायालयाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयातही वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली होती.

    या प्रकरणाच्या पूर्ण झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश कायम ठेवला.

    त्यामुळे आता मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या ना.देवेंद्र फडणवीसांना संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी लागणार आहे. 

     आता ही प्रक्रिया ते किती वेगात करतात किंवा यातही चालढकल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.दरम्यान पोलीस कोठडीतील मृत्यू ही गंभीर बाब मानली जाते.

      यानंतरही फडणवीस सरकारने विविध कारणे देत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यास केलेली चालढकल अनाकलनीय ठरली आहे.

       ना.देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिके नंतर विजयाबाई सूर्यवंशी यांनी “इतका खोटा मुख्यमंत्री पाहिला नाही” अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

      “सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात धडधडीत खोटे बोलले होते.महाराष्ट्राला कलंक लावणारं वक्तव्य केलं”,असा संतापही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.

     सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची दोन कारणे,असं सांगून पोलिसांवर गुन्हे दाखल न करणाऱ्या ना.देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला!..

        कायद्याची परिभाषा वेगवेगळ्या पध्दतीने सांगणारे मुख्यमंत्री व गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे कायद्याच्या चौकटीत राहून सर्वोच्च न्यायालयाचा व संभाजी नगर खंडपीठाचा मान,”सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणातंर्गत राखतील काय? हा महाराष्ट्र राज्यातील जनतेचा त्यांना प्रश्न आहे.

      परंतु कोंबिंग आप्रेशनच्या नावाखाली विशिष्ट समाजावर भयंकर अत्याचार केला जातोय,या अनुषंगाने महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांना शहानपण केव्हा येणार?