शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- टिळकभवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत ३३ टक्के ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत तर ६६ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे.
४१ टक्के ओबीसी, १९ टक्के एससी एसटी तर ३३ महिलांना संधी देण्यात आली आहे. कार्यकारिणीत भौगोलिक व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी खासदार कुमार केतकर,प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे,अनंत गाडगीळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.



