कारण…….
आज जी आमची (भारताची) सर्वांची वाताहत होत आहे. त्यामागे एकच कारण आहे की, आम्ही संविधानक्रांती आणि धम्मचक्रप्रवर्तन क्रांतीला विवेकाच्या आचरणातून सिद्ध करू शकलो नाही. उलट केवळ त्याचे आम्ही दिखाऊ भांडवल केले. हे त्याचे मूळ कारण आहे.
आज आमच्या बौद्ध अनुयायांचा विचार केला तर आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या दोन्ही क्रांत्यांना डोक्यातून हृदयात घेऊन आचरणातून इतरांना दिसायला पाहिजे होते. परंतू ते आम्ही बहिरअंगानेच दाखविण्यात समाधान मानले. परिणामी मनुवाद्यांना आपल्यावर गुलामी पुन्हा लादण्यासाठी सोपे गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी आमच्यासाठी (बौद्ध अनुयायासाठी अर्थात अस्पृश समाजासाठी) महात्मा फुलेंच्या आणि छ. शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या शैक्षणिक क्रांतीच्या आदर्शावर संविधानातून क्रांती तर केलीच सोबतच P. E. S. ची स्थापना करून आदर्श समाज स्थापनेची रचना या क्रांतीतून केली…..
परंतु ,याच शिक्षणसंस्थेची अवस्था आमच्या (पढे लिखे) सुशिक्षितांनी आज रोजी काय अवस्था केली. त्या संस्थेच्या नंतर आलेल्या इतर संस्था कशा प्रगतीशील आहेत. आणि आमच्या संस्थेत मात्र आमच्यातीलच मनुवाद्यांनी मनुवाद्याच्या हातात संस्थेची सूत्रे देऊन आम्हीच आमच्या पायावर दगड पाडून घेतला. आणि अवघ्या 80 वर्षात ही संस्था आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या मोडकळीस आणली.
म्हणजे……
“शिका, संघठीत व्हा आणि संघर्ष करा” या त्रिसूत्रीतला पहिल्या आदेशालाच आम्ही बेईमान झालो. कारण शेवटी शीलाविना विद्या फुकाची.”
परिणामी एवढेच झाले की, सुशिक्षित होऊन पहिल्या आणि कांही प्रमाणात दुसऱ्या पिढीने शिक्षणक्रांतीतून लाभ घेऊन स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधून घेतल्यामुळे ते कसेतरी तग धरून अजून काही दिवस टिकू शकतील.
परंतू , त्यांचीच औलाद आज कुणाचा झेंडा घेऊन मिरवते किंवा कोणत्या संस्कारावर जगून बचावात्मक पवित्रा घेऊन जीव मुठीत घेऊन जगते. हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत.
म्हणून शिका या नैतिक आणि शील या कर्तव्यातून आम्ही शिकलो नाही म्हणून संघठीत होऊ शकलो नाही. परिणामी संघर्ष तर कोसोमैल दूर राहिले. म्हणून आमच्या वाताहातीचे आम्हीच शिल्पकार ठरलो. विज्ञानवादी धम्माच्या ओंजळीत आम्हाला माणूस बनण्यासाठी महामानवाने आम्हाला टाकले.
त्या धम्माच्या बांधिलकीची जबाबदारी आमच्यावर टाकण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. कारण या स्थापनेमागे ते जेंव्हा 14 आक्टोबर 1956 च्या ” मी संघम शरणं ” म्हणणार नाही. याच्या कारणाचा अर्थ दडलेला दिसतो. कारण कोणत्याही धर्माची धुरा ही त्या त्या धर्माच्या धर्मप्रसारक अर्थात धर्मगुरुवर अवलंबून असतो. आणि इथे तर तथागतांच्या महापरीनिर्वाणानंतरच्या पहिल्याच धम्मसंगितीत महायान आणि हीनयानाची बीजे पेरल्या गेली. आणि म्हणूनच की काय पुढे शुद्ध आणि विज्ञानवादी बुद्ध धम्मात ब्राम्हण्यवृतीचा शिरकाव होऊन धम्माला अशुद्ध बनविणाऱ्या काल्पनिक जातक कथाचा भरणा केल्या गेला, की जेणेकरून हा धम्म सुद्धा विज्ञानवादी नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न तत्कालीन भिखू ( षडयंत्रकारी मनुवादी ) संघाकडून झाला. म्हणून संघम शरणं गच्छामी म्हणणार नाही, यावर आडून बसले. म्हणून या भिखू संघाने धम्माचे पावित्र्य राखावे त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने बौद्धाचार्याच्या माध्यमातून समाजाने सुद्धा या भिखू संघाला आचरणातून शुद्ध ठेवण्यासाठी आणि कदाचित याच कारणासाठी या महासभेची निर्मिती बाबासाहेबांनी केली.
परंतू , अवघ्या 60 वर्षात या बौद्ध महासभेची काय अवस्था आहे….?
केवळ परिणय विधी पार पाडणे. आणि प्रमाणपत्र देणे. यापलिकडे मजल गेली नाही. कधी भिखू संघाला जर तो आचरण करत नसेल तर उपासकांच्या मदतीने जाब विचारत नाही.परिणामी आजचा भिखू संघ (एखादा अपवाद सोडून द्या) बहुतांशपणे खेड्यात अशी परिस्थिती आहे की, अनेक गावात शहरापेक्षाही चांगली विहारे आहेत. परंतू भिखविना ओस पडलेली आहेत. भंतेजी खेड्यात जायलाच तयार होत नाहीत…..!
आणि आमचा देश तर खेड्यांचा मिळून बनलाय ना……
केवळ शहरांतच धम्म पसरवायचा ( भ्रष्ट आणि नीतीभ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरुन )का…..?
या खोलात न गेलेले बरे.
परिणामी आमचा आजचा भिखू संघ एक सुद्धा उदाहरण म्हणून अरहंतपदावर पोहचू शकला नाही…….!
याला जबाबदार सुद्धा आजच्या अशा अवस्थेत सापडलेली ही महासभा आहे.
त्याचप्रमाणे आमचा उपासक सुद्धा (यामध्ये अनंत भवरे प्रथम) नैतिकतेशिवाय तसेच विज्ञानवादी, विवेकवादी माणूस बनू शकला नाही. कारण त्याने बावीस प्रतिज्ञाचे पालन केवळ इतरांना दाखविण्यासाठीच केले. घरात आजही ( 2025 मध्ये) पुस्तकांच्या ऐवजी देव्हारा आहे……!
साधे उदाहरण घ्या PES च्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या एका माजी प्राचार्याने साधारण पाच वर्षांपूर्वी घरात गणपती बसवला होता……..!!!
मग साध्या उपासकाला काय दोष देणार….?
एकंदरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघठीत व्हा आणि संघर्ष करा. या तीन आदेशाना आम्ही (बौद्ध अनुयायांनी ) काळिमा फासला……!
म्हणूनच RSS मनुवाद्यांची शक्ती वाढली. आणि आम्ही सर्वजन अलगद त्यांच्या साम, दाम, दंड आणि भेदाच्या जाळ्यात अडकलो……..!
म्हणून ही अशी आज आमची वाताहात झाली.
याचाच अर्थ स्पष्ट आहे की, युगानुयुगे जन्म घेणाऱ्या तथागत भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांना व त्यांच्या क्रांत्यांना समजून घेऊन आचरणातून सिद्ध करण्यात बौद्ध अनुयायी आज कमी पडला, हेच सत्य आहे….!
त्यानंतर बाबासाहेबानी पिढ्यानं पिढ्या वंचित असलेल्या समाजाला राजनैतिक न्याय देण्यासाठी शासनकर्ती जमात बनण्याचा केवळ आदेशच दिला नाही…….
तर RPI ची संकल्पना दिली. ज्या नावातच संपूर्ण भारत देश सामावू शकतो.अशा लोकशाहीप्रधान गणराज्य असलेल्या भारताचा राजकीय पक्ष. परंतू , या राजकीय पक्ष स्थापनेपूर्वीच त्यांचे महापरीनिर्वाण झाले…….
म्हणूनच की काय या पक्षाच्या नावापुढे (कंस) निर्माण होऊन या पक्षाला कंसामाणेच गृहण लागले. जो तो स्वतः आंबेडकर समजायला लागला. म्हणून समाजाला मायेच्या पंखाची उब देणारा ना नेता राहिला……
ना पक्ष किंवा कोणती संघटना राहिली……..
पुन्हा 1991 पूर्वीचा समाज 1956 नंतर पुन्हा पोरका झाला….!
“एखादी पक्षीणी आपल्या पिलासाठी चोचित चारा घेऊन भरधाव आपल्या घराट्याकडे निघावी. वाटेत अनेक हिंस्त्र पक्षांनी तिच्यावर हल्ला चढवावा. तशाच रक्तबंबाळ अवस्थेत कशीबशी घरट्यापर्यंत पोहचावी आणि पिलांच्या तोंडात चारा टाकून तीने मान टाकावी……..!”
अशी बाबासाहेबांची अवस्था होती.
— प्रा.डॉ.दिनकर खाबडे
अशाप्रकारे आम्ही बौद्ध बांधव आमच्या बापाला समजून घेण्यात कमी पडलो…….!
कारण त्यांची प्रतिमा घरात लावण्यापर्यंत आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने विहारे / स्मारके केवळ बांधण्याच्या आणि तिथे बेंबीच्या डेठापासून बोंबलण्याच्या पलीकडे आमची मजल…..
कधी गेलीच नाही. म्हणून आम्हीच आमच्या बापाचे वैचारिक खुनी ठरलो. म्हणूनच आज RSS / भागवत / अप्रत्यक्ष खुनी असलेला नरेंद्र मोदी जो EVM नी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदावर बसला. दुसरा प्रत्यक्ष खुनी शहा दुसऱ्यांदा EVM च्या बळावर गृहमंत्री झाला…..!
अर्थात प्रतीक्रांतीची लाट निर्माण 2014 पासून या देशात सुरुवात झाली.
त्यानंतर या बौद्ध अनुयायाव्यतिरिक्त इतर धर्मीय आणि भारतीय नागरिकांनी मग ते ओबीसी बांधव किंवा बहुजन समाज असो, यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे अस्पृश्य समाजाचे नेते आणि या समाजासाठीच आरक्षण देण्यासाठी यांनी संविधान लिहिले यापलीकडे यांची समज कधी गेलीच नाही.
मी प्रथम भारतीय आणि अंतिमता भारतीय या राष्ट्रीय भूमिकेकडे मुद्दाम डोळेझाक करण्याचे काम यांनी केल्यामुळे बाबासाहेबांचा विज्ञानवाद + विवेकवाद = मानवतावाद आणि यातून निर्माण झालेला राष्ट्रवादी बाणा यांना दिसू शकला नाही. किंवा ब्राम्हण्यवृत्तीकडून दिसू दिल्या गेला नाही…..!
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याहृदयात जाण्यापासून सुद्धा वंचित राहिले……!
शेवटी ज्याप्रमाणे या देशातून बुद्ध धम्माचा जन्म होऊन या देशातून लय झाला. आणि बाहेर देशात फोफावत आहे. अगदी त्याचप्रमाणे आमच्या देशातून “बाबासाहेब ” वंचित राहून अमेरिका त्यांना ” जगाचे विद्वत्तेचे प्रतीक ” मानते……!!!
म्हणून भारताव्यतिरिक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे महापुरुष बनले…..
आम्ही (बौद्ध अनुयायी आणि ओबीसी बांधव, बहुजन समाज, थोडक्यात भारतीय नागरिकांचा समूह म्हणजे समाज) मात्र त्यांना घरात प्रतिमेसमोर अगरबत्ती लावून तीनदा नमन करतो. विहारात जाऊन पुष्पहार अर्पण करतो. सार्वजनिक स्मारकावर जाऊन स्मृतीदिनी, जयंतीदिनी, मोठा पुष्पहार अर्पण करून बोंबलतो. आणि त्यांचे सर्व उपकार फेडल्याचे समाधान मानून फुगलेल्या पोटावरून हात फिरवतो……
“जे त्यांना कधीच मान्य नव्हते……….!!!!”
मी (अनंत भवरे फाजील आत्मविश्वासाने नव्हे तर त्याग आणि समर्पण यातून दृढ आत्मविश्वासाने) तरी शेवटच्या श्वासापर्यंत खरी भीमक्रांती जिवंत आणि तेवत ठेवण्यासाठी लढणार………
तुम्ही……???
जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689


