आधी विचार की आधी कर्म? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आधी विचार आणि नंतर कर्म. कारण माणूस आधी विचार करतो आणि त्यानुसार कर्म करीत असतो. कोणतीही हलचल किंवा कर्म करण्याच्या आधी माणूस विचार करतो की मी कोणते कार्य आणि ते कसे करावे ? हा विचार माणसाच्या मनात येतो, आणि याचे उत्तर त्याला त्याचे मन जसे सांगते त्यानुसार तो कृती करत असतो. म्हणून कोणतेही कार्य किंवा कर्म करण्याच्या आधी माणूस विचार करतो आणि त्यानुसार कृती करत असतो. अर्थात विचार हे चांगले असतील तर माणूस चांगलेच कृती करतो आणि विचार हे वाईट असतील तर माणूस वाईटच कृती करत असतो. याचाच अर्थ जसे विचार तशी कृती. म्हणजेच विचार बदलला की कार्य किंवा कर्म किंवा कृती बदलत असते किंवा घडत असते.
वस्तुस्थिती अशी आहे की, कोणीही चांगले कार्य करत असेल तर त्यास सपोर्ट करतात किंवा विरोध करतात आणि वाईट कार्य कोणी करत असेल तर त्या कार्यास सपोर्ट करतात किंवा विरोध करतात. चांगल्या किंवा सत्यकर्मास विरोध न करता सपोर्ट केले पाहिजे परंतु काही लोक तसे न करता अशा कार्यास विरोध करतात आणि वाईट कार्यास मदत करतात, ही चूक बरेच लोक करतात.
एखाद्या चांगल्या कामाला मदत केल्याने किंवा स्वीकार केल्याने ते कार्य वाढीस लागते आणि एखाद्या वाईट करायला विरोध केल्याने ते काम नाहीसे होते अशी नाही तर विरोधक हे किती शक्तिशाली आहे त्यावरून ते कार्य थोडा वेळ स्थगित होते पण थांबत नाही, कारण विरोधकांचा विरोध कमी झाला की परत ते वाईट कर्म सुरू होते, म्हणून वाईट कामाला विरोध केल्याने ते काम कायमचे बंद होते असे नाही, याकरिता वाईट कामाला विरोध तर केलाच पाहिजे पण याहीपेक्षा महत्त्वाचे हे की, हे वाईट काम ज्या विचारातून निर्माण झाले त्या विचारास विरोध केला पाहिजे, ते विचार थांबणे किंवा नष्ट होणे महत्त्वाचे असते, परंतु त्याकडे विरोधकांचे दुर्लक्ष होत असते, तसे होता कामा नये, कारण जशी विचार तशी कृती घडत असते, म्हणून वाईट विचार मारले पाहिजेत, विचारांना विरोध केला पाहिजे, वाईट कृत्याला तर विरोध केलाच पाहिजे परंतु तेवढ्यावर न थांबता, त्या वाईट कर्माच्या मागचे जे विचार आहेत ते मारण्यासाठी विरोध करण्याची अत्यंत आवश्यकता असते किंवा तसे विचार बदलणे महत्त्वाचे असते, पण वस्तुस्थिती अशी आहे की, कुणीही वाईट कृत्यालाच विरोध करत असतात पण वाईट विचार आला मात्र विरोध करत नाहीत, आणि इथेच चुकत असते. कारण जोपर्यंत वाईट विचार मरत नाहीत तोपर्यंत वाईट कार्य संपणार नाही. अर्थात चांगले काय आणि वाईट काय? सत्य काय आणि असत्य काय ? योग्य काय आणि अयोग्य काय ? याची पार्क कशी करायची? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ? या प्रश्नाचे उत्तर असे की, तर्क आणि अनुभव आणि प्रयोग म्हणजेच प्रयत्न म्हणजेच सत्याचा शोध घेणे, कुणीतरी काहीतरी सांगितले आणि ते गुपचूप ऐकले किंवा काहीतरी पाहिले आणि ते मानले किंवा काहीतरी वाचले आणि ते ग्राह्य मानले , यामुळे सत्य काय ते कळणार नाही. यासाठी तर्क, हनुमान, अनुभव, प्रयोग, आणि प्रयत्न हे सत्य शोधण्याचे मार्ग किंवा साधन आहेत. पावलो पावली याचा वापर केला पाहिजे तरच योग्य विचार आणि योग्य कृती होत असते.
एखाद्या कार्याला कार्यक्रमाला किंवा कृतीला विरोध केल्याने ते कार्य बंद पडत नसते तर ती कृती ते कार्य ज्या विचारातून निर्माण झालेले आहे ते विचार शोधणे तपासणे आणि ते चुकीचे असतील तर त्यास विरोध करणे आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, याशिवाय बदल होत नाही, अधिकाऱ्यास विरोध की आधी विचारास विरोध ? हाही प्रश्न आपल्यापुढे उभारा असतो, याचे उत्तर असे की, समजा कोणी कोणावर बलात्कार केला किंवा अन्याय झाला तर त्या बलात्काराचे किंवा अन्यायाचे कारण शोधीत बसण्यापेक्षा किंवा त्या मागचा विचार तपासात बसण्यापेक्षा पहिल्याप्रथम अशा कृतीस किंवा कर्मा स आधी विरोधच केला पाहिजे, परंतु केवळ विरोध करून न थांबता त्या मागचा विचार याचा शोध घेतला पाहिजे आणि अशी दुष्ट विचार निर्माणच होणार नाही त , अशी काहीतरी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तरच बदल शक्य आहे. अन्यथा अशी वाईट कृती घडतच राहतील आणि त्याला विरोध होतच राहतील, परंतु ही चैन कुठेतरी केव्हातरी तुटल्या गेली पाहिजे, असा विचार होणे पण महत्त्वाचे आणि व्यावहारिक ठरते.
काही माणसे चांगला विचार करतात आणि काही माणसे वाईट विचार करतात किंवा चांगले माणसे सुद्धा कधीकधी वाईट कृती करतात याचे कारण हे संगत सोबत आणि संस्कार हे आहे, हे जरी असले तरी, जिथे वातावरणच किंवा परिस्थितीच वाईट असेल तर बऱ्याच वेळा सुसंस्कार होऊ नये माणसे चुकीचे वर्तन करतात त्याचे कारण म्हणजे चुकीची व्यवस्था हे आहे. व्यवस्थित बिघाड असला म्हणजे परिस्थिती बदलते आणि परिस्थितीत बदल झाला की वातावरण बदलते, म्हणजेच जशी व्यवस्था तशी अवस्था आणि जशी अवस्था तशी परिस्थिती आणि जशी परिस्थिती तसे विचार आणि जसे विचार तशी माणसे आणि जशी माणसे तसे कार्य, हा क्रम लागतो आणि तसे घडत जाते. म्हणून वाईट किंवा चुकीच्या कार्याला विरोध तर केलाच पाहिजे परंतु त्याचबरोबर त्या मागच्या विचाराला पण विरोध केला पाहिजे तरच काहीतरी बदल घडून येईल अन्यथा ठेविले आणते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, असे मनाला समजावे यापेक्षा दुसरे काय घडणार आहे ?


